esakal | 'नासा'ने दखल घेतल्याने जगप्रसिद्ध लोणार सरोवर चर्चेत; काय असावे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

Lake Lonar was noticed by NASA

पृथ्वीचे निरीक्षण करणारी नासाची "नासा अर्थ ऑब्सर्व्हिंग सिस्टिम' ही एक स्वतंत्र प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीतील "लॅंडसेट 8' या उपग्रहाने सरोवराचा रंग बदलण्यापूर्वी (25 मे रोजी) आणि रंग बदलल्यानंतर (10 जून) चे छायाचित्र कैद केले आहे. 

'नासा'ने दखल घेतल्याने जगप्रसिद्ध लोणार सरोवर चर्चेत; काय असावे कारण?

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या अचानक बदललेल्या रंगाची दखल अमेरिकेच्या "नॅशनल एरोनॉटिक्‍स ऍड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन' (नासा)ने घेतली आहे. "नासा'च्या पृथ्वी निरीक्षण प्रणालीने लोणार सरोवराच्या पाण्याचे बदललेले रंग आणि रंग बदलण्यापूर्वीचे फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले आहेत. या पोस्टवर जगभरातील खगोलप्रेमी निसर्गाच्या या आविष्कारावर आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. 

लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अचानक बदलत लालसर गुलाबी झाल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आले. त्यानंतर या पाण्याचे नमुने प्रशासनाने नागपूर येथील नीरी आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला निरिक्षणासाठी पाठविले. पृथ्वीचे निरीक्षण करणारी नासाची "नासा अर्थ ऑब्सर्व्हिंग सिस्टिम' ही एक स्वतंत्र प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीतील "लॅंडसेट 8' या उपग्रहाने सरोवराचा रंग बदलण्यापूर्वी (25 मे रोजी) आणि रंग बदलल्यानंतर (10 जून) चे छायाचित्र कैद केले आहे.

क्लिक करा - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...

हे छायाचित्र नासाच्या निरीक्षण प्रणालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. सायंकाळपर्यंत या पोस्टला जगभरातील 28 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहेत. दोनशेपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील "लेक हिलीयर' सरोवराच्या पाण्याचा रंगसुद्धा या सारखाच लालसर आहे. बेसॉल्ट खडकापासून तयार झालेले लोणार सरोवर 35 हजार ते 50 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाल्याचे नासाने या पोस्टमध्ये सांगितले आहे. 

चंद्रावर या प्रकारची निर्मिती

लोणार सरोवराचा विकासावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, "नासा'चे वैज्ञानिक डॉ. श्‍वॉन राईट यांनी लोणार सरोवराचे संशोधन केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. डॉ. राईट यांच्या मते, या खडकावर काचसदृश वस्तूची निर्मिती होते आहे. सरोवराच्या परिसरातून होणारी ही नवनिर्मिती पृथ्वीवर अन्यत्र कुठेही होत नाही. मात्र, चंद्रावर असलेल्या सरोवराजवळ या प्रकारची निर्मिती झाल्याचे आढळून येते.

असे का घडले? - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत

सेन्सरच्या मदतीने टिपले चित्र

'नासा अर्थ ऑब्सर्व्हिंग सिस्टिम'च्या "लॅंडसेट 8' या उपग्रहाने लोणार सरोवराच्या पाण्याच्या रंगामध्ये झालेला बदल हजारो किलोमीटर दूर अवकाशातून टिपला. कॅलिफोर्निया येथून 2013 साली या उपग्रहाचे प्रक्षेपण "नासा'ने केले होते. जेम्स आयरॉन आणि ब्रुस कुक हे दोन शास्त्रज्ञ या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. हा उपग्रह सेन्सरच्या मदतीने पृथ्वीवरील समुद्र किनारपट्टी, ध्रुवीय बर्फ, बेटे, खंडाचे क्षेत्र आदी विविध भौगोलिक बदलाचे छायाचित्र टिपत असतो. ओएलआय आणि टीआयआरएस या दोन प्रकारच्या सेन्सरद्वारे उच्चप्रतीचे टिपलेले छायाचित्र तो "नासा'ला पाठवितो.