प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम 

केवल जीवनतारे 
Monday, 30 November 2020

२१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे

नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 

२१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले. 

शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत.

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे.
-अर्चना खोब्रागडे,
 शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर)

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodhi Foundation are teaching arts to tribal community children