बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप  

विजयकुमार राऊत 
Wednesday, 30 December 2020

प्राप्त माहितीनुसार जितेंद्र प्रभाकर भुसारी (वय४०, वार्ड नंबर 3, खापरखेडा) असे मृताचे नाव आहे. तो एका कंत्राटदाराकडे २१० मेगावॅट वीज केंद्रात इलेक्ट्रिक मेंन्टेनन्स विभागामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता.

खापरखेडा (जि. नागपूर) : २१० मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात काम करणाऱ्या बेपत्ताअचानक  असलेल्या एका कंत्राटी कामगारांचा मृतदेह कोराडी तलावात बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान आढळून आल्याची घटना कोराडी पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार जितेंद्र प्रभाकर भुसारी (वय४०, वार्ड नंबर 3, खापरखेडा) असे मृताचे नाव आहे. तो एका कंत्राटदाराकडे २१० मेगावॅट वीज केंद्रात इलेक्ट्रिक मेंन्टेनन्स विभागामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास घरी कुणालाही न सांगता तो बेपत्ता झाला होता. बेपत्ता असल्याची तक्रार खापरखेडा पोलिंसात दाखलही करण्यात आली. 

 हेही वाचा - Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे...

दरम्यान तो बेपत्ता झाल्याची माहिती नातलग आणि मित्रांना मिळताच त्याच्या शोधाशोध घेण्यात आले. मंगळवारी कोराडी तलावाजवळ त्याची चप्पल आढळून आल्याने कामगाराने उडी मारूनच आत्महत्या केली असल्याच्या संशय बळावला. स्थानिक पोलिसांनी गोताखोरांचा माध्यमातून शोध घेतला. मात्र कामगाराचा मृतदेह आढळून आला नसल्याने पुन्हा दुसऱ्‍या दिवशी बुधवारी सकाळी शोधण्यास सुरुवात केली. 

सकाळी साडेआठच्या दरम्यान तलावाच्या पुलाजवळ परंपरेत कचऱ्यात तरंगताना आढळले. कोराडी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अकस्मात सदराखाली नोंद घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्यात आले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर

आत्महत्येचे कारण बातमी लिहोस्तर अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याच्यावर अनेकांचे कर्ज असल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांचा चर्चेवरून वर्तविला जात आहे. मृताचे आई-वडील नागपूर येथे राहत असून मृत पत्नी मुलांसह खापरखेड्यात राहत होता.

 संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body of missing contract worker found in Koradi lake Nagpur News