अल्पवयीन मुलीवर पैशांचे आमिष दाखवून शेतात बलात्कार

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 17 October 2020

कन्हान शहराअंतर्गत बारा किलोमीटर अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी व मुलगा बकऱ्या चारायला गेले असताना आरोपी मनीष रवींद्र चौधरी (वय 25) रा.खंडाळा. हा अल्पवयीन मुलीजवळ आला आणि

कन्हान (जि. नागपूर) : कन्हान शहरात अंतर्गत निलज (खंडाळा) गावातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लाॅकडाॅउनच्या काळात एक हजार रूपये देण्याचे आमीष दाखवून युवकाने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

कन्हान शहराअंतर्गत बारा किलोमीटर अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी व मुलगा बकऱ्या चारायला गेले असताना आरोपी मनीष रवींद्र चौधरी (वय 25) रा.खंडाळा. हा अल्पवयीन मुलीजवळ आला आणि तीला एक हजार रुपये देतो म्हणून आमीष दाखवून आरोपी युवकाने जबरदस्ती शेतात घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. एप्रिल 2020 पासुन 16 ऑक्टोबर 2020 या सहा महिन्यात अनेकवेळा पीडित तरुणीवर अत्याचार केले. 

हा प्रकार वडीलांचा लक्षात आला असता वडील आरोपीचा घरी विचारपुस करायला गेले. आरोपीने शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी त्यांना मारहाण केली . आरोपीने एप्रिल महिन्यात बलात्कार केला होता. घरी कुणाला घटनांबद्दल सांगितले असता परिवाराला मारण्याची धमकी दिली होती.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

आरोपी कडुन 16 ऑक्टोबर रोजी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केलेला लक्षात आल्याने वडीलानी मुलीला विचारपुस करीत आरोपी बदल कन्हान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष रवींद्र चौधरी यांचा विरूध्द अपराध क्र.391/20 कलम 376(3),376(2)( एन),323,504,506 ,सह कलम4 अ.वा.स.पिक्सो बाल लैंगिक अपराध अंतर्गत कारवाई केली असून पोलीस निरीक्षक रविंद्र त्रिपाठी यांचा मार्गदर्शनाखाली एपीआय लक्ष्मी मलकुवर अधीक तपास करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy misbehaved with girl in nagpur district