दुर्दैवी! नेहमीप्रमाणे देवांच्या पूजेसाठी आणायला गेला पाणी.. अन घडली हृदयद्रावक घटना

boy is no more by drowning in wardha river
boy is no more by drowning in wardha river

मेंढला (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील  जुनी वस्ती मोवाड येथील पुरातन शिवमंदीरातील देवांची पुजा व त्यांना नित्यनियमाने आंघोळ घालण्याच्या उद्देशाने मंदीर शेजारीच असलेल्या वर्धा नदीतील पाणी आणण्यासाठी गेलेल्या येथील एका तरुण युवकाचा तोल सुटुन नदीत खोलवर बुडाल्याने करून अंत झाला. ही घटना ता १ मंगळवारच्या सकाळी ८ वाजताची असुन तरूणाच्या अचानक मृत्युने गावभर सर्वत्र शोककळा पसरली आहे.

अनिकेत केशव वाघे वय १८ राहणार मोवाड, हा दररोज सकाळी जुनी वस्ती मोवाड येथील अत्यंत पुरातन शिवमंदीरातील देव देवतांची आंघोळ घालुन पुजा अर्चा करीत असतो. घटनेच्या दीवशी तो नित्यनेमाने मंदीरातील देवांना आंघोळ घालणेकरीता मंदीरातीलच दोन प्लास्टीक बकेट घेउन पाणी आणणेकरीता नदीवर गेला. दरम्यान त्याने नदीकाठी बकेट ठेउन आधी अंगावर पाणी घ्याव व आंघोळ करावी म्हणुन त्याने अगदी काठावरच नदी  पात्रात पाय टाकला. 

पाय टाकताच त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज कळला नाही व त्याचा तोल सुटून अथांग पाण्यात खोलवर जाऊन परत वर आलाच नाही. तो वर का आला नाही म्हणुन नदी परीसरात वावरणारे मोवाडचे सामाजीक कार्यकर्ते सुनिल केवटे व अय्याज सैय्यद या दोन तरूणांनी नदीत ऊडी घेऊन जवळपास दोन तास नदीपात्रात अनिकेतचा शोध घ्यायला सुरूवात केली. मात्र तो हाती सापडला नाही असे पोलीस सुत्रांनी कळवीले. 

मुलगा नदीत बुडाल्याची वार्ता कळताच गावातील नागरीकांचा लोंढा जुन्या गावाकडे वळला. मोवाड पोलीस चौकीचे जमादार शैलेश डोंगरदीवे व त्यांची पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली. काही वेळाने खैरगाव येथील जलतरणपटु चांदखाॅं शेख, सुनिल केवटे, अय्याज सैय्यद तसेच गावातील काही नागरीकांनी मिळुन सलग दोन तासाच्या प्रयत्नाने अखेर तरूण तरूणाचा मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढण्यात आला. घटनेची चौकशी व पंचनामा करून मृतदेह ऊत्तरीय तपासणी करीता नरखेड येथे हलवण्यात आला.असुन याप्रकरणी मोवाड पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे. 

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 

मृत अनिकेत हा आपल्या आईवडीलांचा थोरला मुलगा होता.अत्यंत गरीब परीस्थीतीत रोजमजुरी करून तो आपले व आपल्या लहाण भावाचे शिक्षण करून आई वडीलांना हातभार लावत होता. त्याच्या अचानक जाण्याने परीवारावर जणु आभाळच कोसळले असुन गावातही सर्वत्र शोककळा पसरली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com