
भंडारा परसोडी (जवाहरनगर) येथील रहिवासी रमेश खरवाडे आयुध निर्माणी कंपनीतून निवृत्त झाले होते. भंडारा येथे त्यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. मेंदूला दुखापत झाल्याने त्यांना नागपुरात मेडिट्रिना हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
नागपूर : अपघातानंतर उपचारादरम्यान रमेश पांडुरंग खरवाडे (वय ६८)यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी स्वयंस्फूर्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला. यानुसार बुधवारी (ता. २७) उपराजधानीत यकृत आणि दोन्ही किडनी दानातून तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. एका ६२ वर्षीय व्यक्तीला यकृत तर ४४ आणि ४५ वर्षीय व्यक्तींचे खारवाडे यांनी दिलेल्या यकृतासह किडनीदानातून जीव वाचले.
हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू
भंडारा परसोडी (जवाहरनगर) येथील रहिवासी रमेश खरवाडे आयुध निर्माणी कंपनीतून निवृत्त झाले होते. भंडारा येथे त्यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. मेंदूला दुखापत झाल्याने त्यांना नागपुरात मेडिट्रिना हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी खारवाडे यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, मेंदूमृत्यू समितीने दिलेल्या अहवालानानुसार त्यांना २६ जानेवारीला मेंदूमृत्यू घोषित करण्यात आले. त्यानुसार मेंदूमृत रमेश यांची पत्नी शालिनी यांच्यासह मुलगा ऋषिकेश आणि लुकेश यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दरम्यान, समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांनी तत्काळ यकृत, किडनीच्या प्रतिक्षेत आयुष्य जगत असलेल्यांची प्रतिक्षा यादी तपासली.
हेही वाचा - खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले
मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकते, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. २०१३ पासून आतापर्यंत ६९ मेंदूमृत व्यक्तींकडून अवयवदान झाले. यात १२३ जणांना किडनीदानातून जीवनदान मिळाले आहे. तर ५३ जणांना यकृत दानातून नव्याने जग बघण्याची संधी मिळाली.
- डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर.