
तरुणीला ताब्यात घेतले. तिची समजूत घातली. तिच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तरुणीला नातेवाईकाच्या ताब्यात दिले. ही चित्रपटाला शोभेल अशी घटना नागपुरात घडली.
नागपूर : मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आठची वेळ...२० वर्षीय तरुणी गांधीसागर तलाव परिसरात आली. ती काही वेळपर्यंत घुटमळत होती. खोल पाण्याकडे पाहत होती. तिच्या हालचालींकडे जगदीश खरेंची नजर गेली. तिचा हेतू लक्षात येताच हालचालींकडे जगदीश यांनी लक्ष ठेवले. काही क्षणातच तिने तलावात उडी घेतली. जगदीश यांनी लगेच तिच्या पाठोपाठ पाण्यात उडी घेतली आणि तिचे प्राण वाचवले. तिला पाण्याबाहेर काढले. नागरिकांनी गर्दी केली. गणेशपेठ पोलिस आले. त्यांनी तरुणीला ताब्यात घेतले. तिची समजूत घातली. तिच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तरुणीला नातेवाईकाच्या ताब्यात दिले. ही चित्रपटाला शोभेल अशी घटना नागपुरात घडली.
हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू
पोलिस आणि तरुणीच्या नातेवाइकांनी जगदीश खरे यांचे आभार मानले. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जगदीशच्या सतर्कतेमुळे तरुणीचे प्राण वाचवल्याची चर्चा परिसरात होती.
हेही वाचा - देशातील शासकीय रुग्णालयात लठ्ठपणावर पहिली शस्त्रक्रिया नागपुरात; १८७ किलोचा माणूस झाला ८२ किलोचा
युवकाची आत्महत्या -
गांधीसागर तलावात उडी घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली. सतीश दुमकुडवार (तेलीपुरा, सीताबर्डी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातून निघाला होता. त्याने पहाटेच्या सुमारास तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी जगदीश खरे तलाव स्वच्छ करीत असताना त्याला तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला.