"अहो मुंढे साहेब, स्वातंत्र्यदिनापासून शहरात ही पद्धत बंद करा".. काय आहे व्यापाऱ्यांच्या मनात.. जाणून घ्या

businessman seek about losing rule of even odd in city
businessman seek about losing rule of even odd in city

नागपूर :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलग अडीच महिने शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाचव्या टाळेबंदीच्या टप्प्यात निर्बंध शिथिल झाले असताना, सम-विषमचा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण असून, अडीच महिन्यांनी व्यवसाय पूर्ववत होत असताना पुन्हा चालू-बंद होत असल्याने आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे उद्या १५ ऑगस्टपासून सम-विषम पद्धती बद करावी. स्वातत्र दिनापासून आस्थापनांसाठीची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केली आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार शहरातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी सम-विषम तारखांना उघडण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचीदेखील तारांबळ उडत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ ही वेळ वाढविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुकानदारांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे बरीच दुकाने सायंकाळी सहानंतर बंद केली जात आहेत. 

रोज दुकाने सुरु ठेवण्याची द्या परवानगी 

तसेच एक दिवसाआड दुकाने उघडत असल्याने खरेदीसाठी ग्राहक रोज येत आहेत. एकाच दिवशी सर्व प्रकारची खरेदी करणे शक्य होत नाही. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाल्यास गर्दी टाळणे शक्य होईल. ग्राहकांना वेळ अधिक मिळत असल्याने एकाच वेळी गर्दी होणार नाही. एकाच वेळी सर्व दुकाने सुरू राहिल्यास रोज ग्राहकांना बाजारपेठेत यावे लागणार नाही, असेही मेहाडिया म्हणाले.

यासाठी व्यापारी पुढाकार घेतील

नागपुरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी व्यापारी तयार आहेत. प्रशासकीय सूचनांनुसार व्यवसाय सुरू आहेत. मात्र, लॉकडाउनकाळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ आणि नियमित सुरू राहायला हवीत. एक दिवसाआड दुकाने सुरू असल्याने हवा तितका व्यवसाय होत नाही. त्यामुळे कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उभा राहतो. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. गर्दी नियंत्रणात राहील, यासाठी व्यापारी पुढाकार घेतील, असे असोसिएशनचे मेहाडिया म्हणाले. यावेळी सचिव रामअवतार तोतला उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com