मी पदवीधरचा उमेदवार आणि माझ्यावर तब्बल इतके गुन्हे दाखल; आता निवडूण देण्याचा निर्णय तुमचा

नीलेश डोये
Tuesday, 17 November 2020

निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारास वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवर त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची जाहिरात द्यावी लागणार आहे. निवडणूक काळात तीनदा ही जाहिरात द्यावी लागेल. यामुळे मतदारांना निवडून देत असलेल्या व्यक्तीची माहिती होईल.

नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारास त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे. उमेदवारास त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती तीन वेळा वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात प्रसारित करावी लागणार आहे.

लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगार वृत्तीचे व्यक्तीसुद्धा उभे होतात. विजयी सुद्धा झालेत. यावर अनेक सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, लोकशाहीसाठी मारक असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर आळा घालण्याच्या सूचना अनेकांनी केल्यात.

सविस्तर वाचा - चारित्र्यावर संशय घेतल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करुण अंत, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधी निवडताना मतदारांना त्याची संपूर्ण माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करण्यास करण्यात सांगितले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीपासून हा नियम लागू करण्यात आला.

निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारास वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवर त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची जाहिरात द्यावी लागणार आहे. निवडणूक काळात तीनदा ही जाहिरात द्यावी लागेल. यामुळे मतदारांना निवडून देत असलेल्या व्यक्तीची माहिती होईल. गुन्हेगार स्वरूपाच्या व्यक्तीला कायदेमंडळात प्रवेश करण्यापासून रोखण्यास प्रतिबंध घालण्याचा हेतू यामागे असल्याचे सांगण्यात येते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates will have to provide information on crimes