गांजा तस्कर चंदाबाई होती तिरुपतीत वास्तव्याला; तस्करीचे केंद्र

अनिल कांबळे
Friday, 2 October 2020

नागपुरातून फरार झाल्यानंतर चंदाबाई ही आंध्रप्रदेशात गेली. या ठिकाणी आश्रय मिळविण्यासाठी तिने आंध्रातील गांजा तस्करांशी संपर्क साधला. मात्र, तिचा संपर्क झाला नाही. त्यानंतर ती तिरुपती येथे गेली. तेथे तीन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ती नागपुरात परतली. पोलिस मागे असल्याने ती वेळोवेळी आपले आश्रयस्थान बदलवीत होती.

नागपूर : गांजा तस्करीत ‘वॉण्टेड’ असलेली कुख्यात गांजा तस्कर चंदाबाई प्रदीप ठाकूर (वय ५०, रा. शांतीनगर) ही काही दिवस तिरुपती येथे वास्तव्य होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंध्रप्रदेश हे गांजा तस्करीचे केंद्र असल्याने ती या ठिकाणच्या तस्करांच्या संपर्कात असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंदाबाईला गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची चार दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. जुलै महिन्यात गुन्हेशाखा पोलिसांनी चंदाबाईच्या घरी छापा टाकला होता. तिच्या घरातून मद्य व गांजा जप्त केला. यावेळी चंदाबाई फरार होण्यात यशस्वी झाली होती.

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

नागपुरातून फरार झाल्यानंतर चंदाबाई ही आंध्रप्रदेशात गेली. या ठिकाणी आश्रय मिळविण्यासाठी तिने आंध्रातील गांजा तस्करांशी संपर्क साधला. मात्र, तिचा संपर्क झाला नाही. त्यानंतर ती तिरुपती येथे गेली. तेथे तीन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ती नागपुरात परतली. पोलिस मागे असल्याने ती वेळोवेळी आपले आश्रयस्थान बदलवीत होती.

मंगळवारी गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे सहायक निरीक्षक योगेश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कळमन्यात छापा टाकून चंदाबाईला अटक केली. तिला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या स्वाधीन केले. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी चंदाबाईला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. नागपुरात तिला कोणी-कोणी आश्रय दिला याचा शोध अमली पदार्थ विरोधी पथक घेत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cannabis smuggler Chandabai stay in Tirupati