"वाकाटकां'च्या राजधानीलाही बाधा, नगरधनमध्ये पसरली दहशत...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

जिल्ह्यातील रामटेक तालुका आतापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र, नगरधन येथील तरुण पुण्यावरून 23 तारखेला चिचाळा व नगरधन येथे आला. पुण्यातील एका बॅंकेत अधिकारी असलेला तरुण गर्भवती पत्नीला घेऊन विमानाने नागपूरला आला. तेथून एका स्कॉर्पिओ गाडीने प्रथम तो नगरधन येथून तीन किमी असलेल्या चिचाळा येथे सासुरवाडीला आला. तेथून मग तो नगरधन येथील घरी पोहोचला.

रामटेक (जि.नागपूर): वाकाटकांच्या राजधानीचे शहर नगरधन. येथून आज तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुण्यावरून आलेल्या 29 वर्षीय तरुणाचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आल्याने नगरधन येथे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे या तरुणाच्या गर्भवती पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. तरुण राहत असलेला माळीपुरा परिसर सील करण्यात आला असून, त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना "होमक्वारंटाइन' करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तरुणाला नागपूरला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा  :  "त्यांच्या' नोकरीवर आहे टांगती तलवार, वाचा सविस्तर

गर्भवती पत्नी निघाली "निगेटिव्ह'
जिल्ह्यातील रामटेक तालुका आतापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र, नगरधन येथील तरुण पुण्यावरून 23 तारखेला चिचाळा व नगरधन येथे आला. पुण्यातील एका बॅंकेत अधिकारी असलेला तरुण गर्भवती पत्नीला घेऊन विमानाने नागपूरला आला. तेथून एका स्कॉर्पिओ गाडीने प्रथम तो नगरधन येथून तीन किमी असलेल्या चिचाळा येथे सासुरवाडीला आला. तेथून मग तो नगरधन येथील घरी पोहोचला. उच्चशिक्षित असूनही कोरोना विषाणूविषयीच्या शासनाच्या निर्देशाचे पालन मात्र या तरुणाकडून झाले नसल्याची माहिती आहे. तो स्वतःहून नगरधन येथील आरोग्यकेंद्रात न जाता घरीच राहिला. आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात माहिती मिळाल्याने त्याला व पत्नीला रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाच्या कोव्हिड केअर केंद्रात 26 जून रोजी बोलावून त्यांचे घशाचा द्राव तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला.

अधिक वाचा  :  मृगया चिन्हाचे संग्रहालय आता नागपुरात होणार...प्रस्ताव तयार करण्याची वनमंत्रयांनी केली सुचना

तरूणाच्या घरी किराणा दुकान
आज 27 जून रोजी दुपारनंतर तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तालुका आरोग्यविभागाला प्राप्त होताच प्रशासन खडबडून जागे झाले. उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, प्रभारी तहसीलदार कुमरे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, तलाठी बांगर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी नगरधनचे सरपंच येथे दाखल झाले. तरुण राहात असलेला किल्ला भागातील माळीपुरा परिसर सील करण्याची कारवाई करण्यात आली. तरुणाच्या घरी किराणा दुकान असून त्याने दुकानात साहित्यांची विक्रीही केल्याने परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The capital of "Wakatkan" was also affected, panic spread in the city ...