`त्यांच्या` नोकरीवर आहे टांगती तलवार...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

मार्च महिन्यापासून टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणानंतर बंद करण्यात आलेली महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत.

नागपूर : दोन वर्षांपासून त्यात भर टाकत विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांची नेमणूक सुरू केली. गेल्यावर्षी 107 प्राध्यापकांची निवड करण्यात आली. याशिवाय बऱ्याच जागा भरण्यात आलेल्या नसल्याने त्या ठिकाणी अंशकालीन प्राध्यापकांची निवड केली. मात्र, मार्च महिन्यापासून कोरानामुळे महाविद्यालये बंद आहेत.

यंदाचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होईल याबाबत स्पष्टता नाही. यामुळे महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या नेमणूकांवरही गडांतर आलेले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठांमध्येही त्यांची नेमणूक होईल का? याबाबतही शंका आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

नागपूर विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. अनुदानित महाविद्यालयासह खासगी महाविद्यालयात बऱ्याच प्रमाणावर रिक्त पदे आहेत. राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी विद्यापीठातील 80 टक्के प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली होती.

मात्र, ही प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. दुसरीकडे विद्यापीठात चाळीस विभाग आणि तीन महाविद्यालयाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून पदभरती झाली नसल्याने बऱ्याच प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दरवर्षी हे विषय शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणानंतर बंद करण्यात आलेली महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. यावर्षी रिक्त जागांवर भरण्यात येणाऱ्या अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती महाविद्यालयांनी टाळली असल्याने तासिका तत्वावर काम करणाऱ्यांची हलाखीची स्थिती आहे. 

महाविद्यालयाचे वर्कलोड बघता, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना नेमणे आवश्‍यक आहे. मात्र, महाविद्यालये नियमित सुरू झालेली नसल्याने सध्या ही प्रक्रिया थांबली आहे. महाविद्यालये नियमित सुरू होताच त्यांची नियुक्ती केली जाईल. 
- डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of professors working on period basis