esakal | 'एम्स’मध्ये सुरू झाले हृदयावर उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Cardiac treatment started at AIIMS

नागपूरमध्ये शासनस्तरावर मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनंतर ‘एम्स’मध्ये हृदयरोग विभाग सुरू झाला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सागर माकोडे यांनी बाह्यरुग्ण विभागात सेवा देणे सुरू केले. नागपुरातील एम्स दुसरे शासकीय रुग्णालय आहे.

'एम्स’मध्ये सुरू झाले हृदयावर उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : नागपुरातील मिहान परिसरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्यात आले. निवडक उपचार होत आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात एम्समध्ये एक हजार कोरोनाबाधितांवर उपचार झाले. रुग्णांना समाधान मिळू लागले. तसतसे येथे विविध विभाग सुरू करण्यात आले. केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. आता येथे ह्रदयरोग विभाग सुरू करण्यात येत आहे. हृदय विभागाचे डॉक्टर एम्समध्ये रूजू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात या बाह्यरुग्ण विभागात सेवा सुरू होईल. तर लवकरच आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येईल.

नागपूरमध्ये शासनस्तरावर मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनंतर ‘एम्स’मध्ये हृदयरोग विभाग सुरू झाला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सागर माकोडे यांनी बाह्यरुग्ण विभागात सेवा देणे सुरू केले. नागपुरातील एम्स दुसरे शासकीय रुग्णालय आहे.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

हृदयरोग विभाग दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. त्यांच्यावर निःशुल्क उपचार होतील. तर सधन वर्गालाही माफक दरात उपचार मिळणार आहेत. सद्या एम्समध्ये औषध वैद्यकशास्त्र, शल्यक्रियाशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, बालरोग विभाग, कान-नाक-घसा रोग विभाग, नेत्ररोग विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग, अस्थिरोग विभागातील सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

किडनीग्रस्तांसाठी ठरेल वरदान

हृदयरोग विभागासह येथे किडनी आजारावरही उपचार लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली. याशिवाय श्वसन व छातीशी संबंधित आजारावर उपचार होतील. हृदय, किडनी आणि श्वसन रोगावरील उपचारासाठी एम्समध्ये डॉक्टरांच्या क्लिनिकल संवर्गात निवड प्रक्रिया झाली. किडनी विभागाचे डॉ. आनंद चेलाप्पन, हृदयरोग विभागाचे डॉ. सागर माकोडे, श्वसनरोग व छातीरोग विभागाचे डॉ. सत्यजित साहू रुजू झाले आहेत.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

हृदय, किडनीसह श्वसन विभाग सुरू
एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात एम्सचा विकास अतिशय गतीने होत आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी अल्पावधीत प्रयोगशाळा सुरू केली. कोरोनाबाधितांसाठी एम्स वरदान ठरले आहे. एक हजार बाधितांवर उपचार झाले. टप्याटप्प्याने एम्सचा विकास होत आहे. हृदय, किडनीसह श्वसन विभाग सुरू झाला आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार,
वैद्यकीय अधीक्षक, एम्स

संपादन - नीलेश डाखोरे