दुसरा घरोबा थाटणाऱ्या केबल व्यावसायिकावर गुन्हा; पहिल्या पत्नीने दिली तक्रार

Case filed against cable operator
Case filed against cable operator

नागपूर : पहिल्या पत्नीच्या नकळत केबल व्यावसायिकाने कार्यालयात कामाला असलेल्या युवतीसोबत दुसरा घरोबा थाटला. यानंतर पहिल्या पत्नीचे दागिन्यांसह लग्नात मिळालेले स्त्रीधन लाटले. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भुरे (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पहिली पत्नी सुषमा भुरे (वय ३९, रा. श्रीनाथ साईनगर, ओंकारनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल यांचा केबलचा व्यवसाय आहे. त्यांच्या कार्यालयातह मंजूषा नावाची युवती कामाला होती. ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान अमोलने मंजूषासोबत लग्न केले.

त्यानंतर अमोलने सुषमा यांना लग्नात मिळालेले दोन लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने व अन्य साहित्य असे पाच ते सहा लाखांचे साहित्य घरून गायब केले. दुसऱ्या लग्नाबाबत माहिती मिळाल्याने सुषमा यांनी पतीला जाब विचारला असता त्याने मारहाण केली. अजनी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत, तहसील कार्यालय परिसरातच सुरू असलेल्या समांतर सेतू कार्यालयाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी सदर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष जयस्वाल असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तो आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गोरखधंदा करीत होता. उत्पन्नाचा दाखला काढण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. परंतु, बरेचदा संपूर्ण दिवस लागतो. यामुळे दलालाकरवी प्रमाणपत्र तयार करवून घेण्यात येतात.

आरोपींनी मात्र सक्षम अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करून घेतले. सर्व प्रकारच्या शासकीय प्रक्रिया बायपास करून ही मंडळी हुबेहूब प्रमाणपत्राचे प्रिंट काढून संबंधित व्यक्तीला देत होते. हा प्रकार लक्षात येताच नायब तहसीलदार आभा वाघमारे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तिसऱ्या घटनेत, बनावट ओळखपत्राच्या मदतीने विक्री व्यवहार करीत भूखंड लाटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नवे प्रकरण बेलतरोडी हद्दीत उघडकीस आले आहे. बेलतरोडी येथील रहिवासी कविता नगराळे (५०) व त्यांचा भाऊ पराग गरडे यांनी मौजा सोमलवाडा येथील राधाकृष्ण हाउसिंग सोसायटीतील दोन भूखंड खरेदी केले आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

दोन अज्ञात आरोपींनी कविता व पराग यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. त्याच्या मदतीने दोन्ही भूखंड विक्रीचा व्यवहार केला. जून ते १२ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. ही बाब उघडकीस येताच नगराळे यांनी बेलतरोडी ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com