esakal | गावात एकच प्रश्न... आज काय आहे? काय झाले? अरेऽऽ साहेबांचा वाढदिवस आहे, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

गावात एकच प्रश्न... आज काय आहे? काय झाले? अरेऽऽ साहेबांचा वाढदिवस आहे, वाचा सविस्तर

कामात कसलाच कसूर ते सोडत नाही. पण आज वाळू माफियांच्या बाबतीत काही औरच आहे. नेहमी वाळूमाफिया घोंगावतांना लोकांच्या नजरेत खुपणारे झाले आहे. अरोली पोलिस ठाणे म्हणजे माफियांचा हब की काय असाही सवाल आहे. मात्र, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर वचक लावण्यात अपयशी ठरले हे मात्र त्यांना पचवावे लागेल.

गावात एकच प्रश्न... आज काय आहे? काय झाले? अरेऽऽ साहेबांचा वाढदिवस आहे, वाचा सविस्तर

sakal_logo
By
संदीप गौरखेडे

कोदामेंढी (मौदा, जि. नागपूर) : मागील पाच महिन्यांपासून कोरोनामुळे सण उत्सव आणि लग्न समारंभ धूम धडाक्यात करण्यावर बंदी घातली आहे. एखाद्या उत्सवाची मिरवणूक अथवा लग्नाची वरात बँड, डिजे आणि आतषबाजी विनाच निघाली. जणू सर्व आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले. मात्र, मौदा तालुक्यात आतषबाजी झाली. गावात आज काय आहे? काय झाले? असे प्रश्न एकमेकांना विचारण्यात आले. तेव्हा पुढील उत्तर समोर आले...

२३ फेब्रुवारी २०१९ ला अरोली पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारून विवेक सोनवणे यांनी जोरदार एंट्री मारली. ‘सिंघम’ नावाने नावलौक मिळविला. सिंघमची दबंगगिरी यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. यामुळे आम जनतेला बरे वाटले. तसेही समाजाबाबत आणि सामाजिक कार्यात त्यांचा चांगला सहभाग असतो. या भागात वाळू माफियांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यांच्यावर देखील लगाम लागेल असेही जणू वाटले होते.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर झाले उलट. वाळू माफियांशी दर्दी दोस्ती. पूर्वी ट्रॅक्टरनी वाळूची वाहतूक चालायची ती आता ट्रकवर आली. एक दिवस पूर्वीपासून सोशल मीडियावर साहेबांवर शुभेच्छाचा वर्षांव सुरु होता तर काही माफियांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि एक स्वीय प्रतिनिधी आभार धन्यवाद व्यक्त करीत होता.

विशेष म्हणजे या दिवशी बऱ्याच माफियांची फेसबुक आणि व्हाट्सॲप डीपी तसेच स्टेट्स म्हणजे साहेबांचा वाढदिवस हेच होते. जल्लोषात साहेबांचा वाढदिवस म्हणजे माफियांचे भले होत असल्यानेच तितका प्रेम सहजच आहे. मोठा केक आणि इतर केक कापून बर्थडे सेलिब्रेट करण्याची मज्जा काही औरच.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

मात्र, याबाबतचे कसलेही फोटो सोशल मीडियावर वायरल न होण्याची खबरदारी त्यांच्या सहकार्यांनी बाळगली हे मात्र तितकेच विशेष म्हणावे लागेल. ठाणेदार यांचा वाढदिवस आतषबाजीने साजरा झाला. गावात आज काय आहे? काय झाले? अशा भ्रमात पडले. नंतर कुणीतरी सांगतो आज साहेबाचा वाढदिवस आहे.

कामात कसलाच कसूर ते सोडत नाही. पण आज वाळू माफियांच्या बाबतीत काही औरच आहे. नेहमी वाळूमाफिया घोंगावतांना लोकांच्या नजरेत खुपणारे झाले आहे. अरोली पोलिस ठाणे म्हणजे माफियांचा हब की काय असाही सवाल आहे. मात्र, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर वचक लावण्यात अपयशी ठरले हे मात्र त्यांना पचवावे लागेल.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील नायब तहसीलदार नवनाथ कातकडे आता मौदा येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. त्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात वाळू माफियांनी नऊ केक कापून साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते आणि तशी बातमी देखील वृत्तपत्रात झळकली. माफियासाठी अधिकारी म्हणजे जणू देवदूतच समजावे. अशीच काही प्रचिती यातून दिसून येते.

फटाके फुटलेच नाही
फटाके फुटलेच नाही. मी ठाण्यातच होतो. वाळुफाफिया नव्हते. चोरांशी कशाला जवळीक साधू. फेसबुकवर इतरांनी देखील शुभेच्छा दिल्या.
- विवेक सोनवणे,
ठाणेदार अरोली