नागपुरात महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग; तिसऱ्या फेरीतही अभिजित वंजारी आघाडीवर 

Chances of wiinning of Abhijit wanjari in Nagpur
Chances of wiinning of Abhijit wanjari in Nagpur

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १ डिसेंबरला मतदान झाले. आज येथील मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे.मात्र भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदारसंघाला महाविकास आघाडी सुरुंग लावणार की काय अशीच चिन्हे आहेत.  तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी हे एकूण ९६११ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे संदीप जोशी दुसऱ्या स्थानावर असून त्यांना एकूण २५  हजार ८९८ मते मिळाली आहेत. तर अभिजित वंजारी यांना ३५ हजार ५०९ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपचा बालेकिल्ला जवळजवळ हातातून गेल्याची शक्यता वारवण्यात येतेय. 

पदवीधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारताय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही नेमका अंदाज कुणाला लावता आलेला नव्हता. त्यामुळे पण गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने लढत अतिशय अटीतटीची झाली. त्यामुळे भाजपचा गढ यावेळी राखला जातो की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय जाणकार अंदाज लावायला कचरत होते. पहिल्याच फेरीत अभिजित वंजारींनी आघाडी घेतल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत आनंद तर भाजपच्या गोटात चिंता दिसतेय. 

अभिजीत वंजारी ३५ हजार ५०९, संदीप जोशी २५ हजार ८९८, राजेंद्रकुमार चौधरी १४९, इंजीनियर राहुल वानखेडे २हजार ३२३, ॲङ सुनिता पाटील ९५, अतुलकुमार खोब्रागडे ५ हजार ७५७, अमित मेश्राम ४२, प्रशांत डेकाटे ९०३, नितीन रोंघे ३१५,  नितेश कराळे ४ हजार ३१४, डॉ. प्रकाश रामटेके १०२, बबन तायवाडे ६२, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ३९, सी.ए. राजेंद्र भुतडा ९८७, प्रा.डॉ. विनोद राऊत १०४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ४८, शरद जीवतोडे २४, प्रा.संगीता बढे ६१ आणि  इंजीनियर संजय नासरे ४० मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत आहे. 

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर पदवीधर मतदारसंघात दमदार कामगिरी करणाऱ्या ऍड अभिजित वंजारी याची प्रत्येक फेरीत वाढणारे मताधिक्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी बाहेर फटाके फोडून मिळत असलेल्या मताधिकक्याचा आनंद साजरा केला. यावेळी काँग्रेस जिंदाबाद चे नारे देत कार्यकर्ते अभिजित वंजारी याच्या जयघोष करीत होते.

आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांना समज

मतमोजणी दरम्यान होत असलेल्या दिरंगाईमुळे विभागीय आयुक्तांनी मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी मतमोजणीत कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी त्यांनी दिली. याशिवाय त्यामुळे उद्यापर्यंत मतमोजणी लांबणार असल्याचेही ते म्हणाले. रात्री अकरा वाजले तरी तिसऱ्या फेरीचे निकाल आले नव्हते हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com