कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या गाड्यांच्या वेळापत्रकात केले बदल

Changes in train schedules
Changes in train schedules

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अत्यंत मर्यादित स्वरूपात काही विशेष गाड्याच चालविण्यात येत आहेत. त्यातील नागपूरमार्गे धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

02442 नवी दिल्ली-बिलासपूर एक्‍स्प्रेस 4 जुलैपासून नई दिल्ली येथून दुपारी 3.45 वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता नागपुरात पोहोचेल आणि दुपारी 12 वाजता बिलासपूर स्टेशन गाठेल. 02441 बिलासपूर-नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 6 जुलैपासून बिलासपूर येथून दुपारी 2 वाजता रवाना होऊन रात्री 8.15 वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.

02434 नवी दिल्ली-चेन्नई एक्‍स्प्रेस गुरुवारपासून दुपारी 3.45 वाजता नवी दिल्ली येथून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.25 वाजता नागपूरला पोहोचेल आणि रात्री 8.40 वाजता नागपूर स्थानक गाठेल. 02433 चेन्नई-नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 4 जुलैपासून चेन्नई येथून सकाळी 6.35 वाजाता रवाना होईल. रात्री 9.10 वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.

02438 नवी दिल्ली-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस 5 जुलैपासून दुपारी 3.45 वाजता नवी दिल्ली येथून नवाना होईल. पहाटे 5.25 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि दुपारी 2 वाजता सिकंदराबाद स्थानक गाठेल. 02437 सिकंदराबाद - नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 8 जुलैपासून दुपारी 12.45 वाजता सिकंदराबाद येथून रवाना होईल. रात्री 8.35 वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com