esakal | अबब! मटण खातोय 'भाव', सातशे रुपयांवर पोहोचूनही खवय्यांची नाही कमी
sakal

बोलून बातमी शोधा

chicken 70 and the mutton 700 Rs kg in Nagpur

कोरोनाच्या धास्तीने खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरविल्याने चिकन 70 रुपये तर मटण सातशे रुपये किलोने विकले गेले. यामुळे मटणविक्रेते जोमात तर चिनकविक्रेते कोमात असे चित्र धूळवडीच्या दिवशी शहरात होते. मंगळवारी मटणाच्या दुकानांवर पहाटेपासूनच खवय्यांच्या रांगा होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत मटण व मासे विक्रेत्या दुकानांसमोर गर्दी होती.

अबब! मटण खातोय 'भाव', सातशे रुपयांवर पोहोचूनही खवय्यांची नाही कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना...! सध्या देशात काय जगात कोरोना व्हायरचीच दहशत आहे. रोज एक ना एक कोरोना व्हायरस ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अफवाही पसरवली जात आहेत. यंदा होळी खेळू नका असे आवाहनही करण्यात आले. यामुळे अनेकांनी होळीही खेळली नाही. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो अशी अफवा पसरवल्याने अनेकांचा व्यवसाय बुडाला आहेत. अनेकांवर अपासमारीचीही वेळ आली. या अफवेमुळे अनेकांनी होळीला चिकनच न खाल्याने चिकन विक्रेते कोमात तर मटण विक्रेते जोमात अशीच स्थिती पाहायला मिळाली. 

धूलिवंदनाच्या दिवशी चिकन व मटणाला चांगली मागणी असते. प्रत्येकजण या दिवशी नॉनवेज खाल्याशिवाय राहत नाही. गरिबातील गरीब आणि श्रीमंत या दिवशी नॉनवेजचा आस्वाद घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही नॉनवेज विक्रेत्यांच्या दुकानासमोर 
वय्यांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांची चांगलीच रांग पाहायला मिळत होती. मात्र, ही रांग चिकन विक्रेत्यांच्या दुकानांसमोर नव्हे तर मटण विक्रेत्यांच्या दुकानांसमारे होती. 

हेही वाचा - नागपुरात दादागिरी वाढली, वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुंडाने ओलांडली सीमा

कोरोनाच्या धास्तीने खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरविल्याने चिकन 70 रुपये तर मटण सातशे रुपये किलोने विकले गेले. यामुळे मटणविक्रेते जोमात तर चिनकविक्रेते कोमात असे चित्र धूळवडीच्या दिवशी शहरात होते. मंगळवारी मटणाच्या दुकानांवर पहाटेपासूनच खवय्यांच्या रांगा होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत मटण व मासे विक्रेत्या दुकानांसमोर गर्दी होती. 500 रुपये किलो दराने मिळणारे मटण आता 650 ते 700 रुपये दरावर पोहोचले आहे. परंतु, करोनामुळे चिकनाचे भाव कोसळले आहे. परिणामी, ठोक बाजारात चिकन मातीमोल भावाने विकले जात असल्याने कुक्कुट पालन करणारे शेतकरी हवालदील झालेले आहेत. 

सर्वत्र भयग्रस्त वातावरण

शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी बहुतांश घरी चिकन, मटणाचा बेत असतो. वर्षभरातील हक्काचा मांसाहार करण्याचा दिवस म्हणून धुळवडीकडे पाहिले जाते. चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरचे सावट यंदा नागपुरातही दिसून आले. भारतातही काही कोरोनाग्रस्त आढळल्याने सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे. 

भाव 70 तरीही पाठ

सोशल मीडियावर अफवांना पेव आल्याने चिकनमुळे कोरोनोचा फैलाव होतो, असा गैरसमज पसरल्याने चिकन खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली. दोनशे रुपये किलोने विकले जाणारे कोंबडीचे मांस 70 रुपये किलोने विकूनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली. याउलट बोकडाच्या मटणासाठी साडेसहाशे ते सातशे रुपये किलो दर देऊन ग्राहकांनी मटण खरेदीसाठी गर्दी केली होती. 

जाणून घ्या - तीन तासांचा पेपर दोन तासांत सोडवला अन् प्रियकरासोबत झाली फुर्रर्र..

कोल्हापुरात झाले होते आंदोलन

कोल्हापुरात मटणाचे भाव 580वर पोहोचल्यानंतर मोठे आंदोलन झाले होते. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत भाव कमी करण्याची मागणी लावून धरली होती. नागरिकांच्या आंदोलनापुढे झुकत मटण विक्रेता संघटनांनी भाव कमी करीत नागरिकांना दिलासा दिला होता. यामुळ भाव 530 ते 540 पर्यंत स्थिरावले आहे. हे भाव होळीच्या दिवशीही वाढले नव्हते. मात्र, नागपुरात मटणाचे भाव 700 ते 730 पोहोचले होते.