"करोना'चा चिकन, मटण अंड्यांनाही फटका; विक्री निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नागपुरात जवळपास आठवड्यात 300 किलो चिकनची विक्री होत असे. गेल्या आठवड्यापासून "करोना व्हायरस' याबाबत सोशल मिडियावर बऱ्याच अफवा येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये 150 किलोच चिकनची विक्री झाल्याचे दिसते. विदर्भात हा आकडा बराच मोठा आहे

नागपूर : "करोना' व्हायरसच्या भितीपोटी चिकन, मटण विक्रीचा व्यवसायात कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडे विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली.

दुधबडे म्हणाले, नागपुरात जवळपास आठवड्यात 300 किलो चिकनची विक्री होत असे. गेल्या आठवड्यापासून "करोना व्हायरस' याबाबत सोशल मिडियावर बऱ्याच अफवा येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये 150 किलोच चिकनची विक्री झाल्याचे दिसते. विदर्भात हा आकडा बराच मोठा आहे

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?

होलसेलमध्ये 80 रुपये किलो चिकन विकल्या जाते. मात्र, व्हायरसच्या अफवांनी ती किंमत 50 रुपये प्रतिकिलोवर आलेली आहे. त्यामुळे प्रति कोंबडी 30 रुपयांचे नुकसान होत असून दर आठवड्याला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केवळ चिकनच नव्हे तर मटण आणि मासोळी विक्रीतही बरीच घट झालेली आहे. अनेक बाजारात मटन विकल्या गेलेले नाही. जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्‍कुटपालन, शेळीपालन आणि मासोळीचा व्यवसाय करतात. अंडे विक्री व्यवसायावरही "व्हायरस'चा परिणाम दिसून येत आहे. 4.50 रूपये प्रति नग असलेले अंडे आज बाजारात 3.80 रूपयांनी विकावे लागत आहे.
माफसू करणार जागृती
कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर म्हणाले, "करोना व्हायरस'विषयी सरकारकडून दक्षता अगोदरच घेण्यात आलेली आहे. शिवाय आपल्याकडील खानपानाच्या पद्धतीमुळे तो पसरण्याचे कारण नाही. याउलट चीन आणि इतर देशात कच्चे मांस आणि इतर अनेक प्राण्यांचे मांस जेवणात असल्याने तेथे संसर्ग वाढत आहे. माफसू याबाबत जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत विद्यापीठातील सर्व अधिकारी उपस्थित होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiken & eggs selling affected due to carona