मी पण डोरेमॉन, छोटा भीम, शिंगचॅंग; बच्चेकंपनीत क्रेझ... हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

पुढील काही दिवस मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्वत्र करण्यात येते आहे. त्यामुळे देशात मास्कचे उत्पादन प्रचंड वाढले. विशेष म्हणजे यात शादी मास्क, कार्टून मास्कची उलाढाल कोट्यवधींच्या घरात होत असून, मुलांनी कंटाळून मास्क काढून टाकू नये यासाठी कार्टून मास्क तयार करण्यात आल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. विशेष म्हणजे कार्टून चॅनल्सवर प्रसिद्ध असलेल्या कार्टूनचे प्रिंट असलेल्या मास्कची किंमत जास्त आहे. तर विशेष प्रसिद्ध नसलेल्या मास्कची किंमत तुलनेने कमी आहे.

नागपूर : तीन महिने सतत कानावर पडलेला "कोरोना' हा शब्द प्रत्येकालाच नकोसा झालेला आहे. कधी एकदाचे हे संकट टळते अन्‌ सामान्य जीवनाची सुरुवात होते, याचीच प्रत्येकजण वाट बघतो आहे. या संकटाने माणसाच्या जीवनशैलीत अनेक बदल घडविले. आता मास्क वापरणे बंधनकारक झाले असून, या संधीचा फायदा घेत उद्योजगांनी रंगीबेरंगी फॅशनेबल मास्कची निर्मिती केली आहे. यात आकर्षक कार्टूनच्या मास्कची बच्चेकंपनीत मोठी क्रेझ आहे.

पुढील काही दिवस मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्वत्र करण्यात येते आहे. त्यामुळे देशात मास्कचे उत्पादन प्रचंड वाढले. विशेष म्हणजे यात शादी मास्क, कार्टून मास्कची उलाढाल कोट्यवधींच्या घरात होत असून, मुलांनी कंटाळून मास्क काढून टाकू नये यासाठी कार्टून मास्क तयार करण्यात आल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. विशेष म्हणजे कार्टून चॅनल्सवर प्रसिद्ध असलेल्या कार्टूनचे प्रिंट असलेल्या मास्कची किंमत जास्त आहे. तर विशेष प्रसिद्ध नसलेल्या मास्कची किंमत तुलनेने कमी आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासूनच भारतीयांना कोरोनाशी लढण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे लहान मुलांच्या मास्कवर बंदुकधारी कार्टून्सनेदेखील जागा मिळवली आहे; शिवाय डोरेमॉन, छोटा भीम, शिंगचॅंग, मोटू पतलू, डोनाल्ड डक, नोबिताचे प्रिंटिंग असलेल्या मास्कचीदेखील लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. तर मुलींच्या बार्बी डॉल, ट्विटीचे प्रिंटिंग असलेल्या मास्कची मागणी जास्ती आहे. हे मास्क लहान मुलांच्या चेहऱ्याचा आकार बघता तयार करण्यात आल्याने मुलांच्यादेखील ते पसंतीस येत आहेत.

अवश्य वाचा- नागपुरात विवाहासाठी आता फक्त २७ हजारांचे पॅकेज...खर्च कमी, सुरक्षेची हमी

शादी मास्कची वाढतेय मागणी

लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेले विवाहसोहळे आता होणे प्रारंभ झाले आहे. मोजक्‍याच मंडळींमध्ये विवाहास शासनाने परवानगी दिली असून, वधू-वराच्या इच्छेनुसार हे सोहळे आयोजित करण्यात येत आहे. मात्र, कोरोनामुळे वधू-वराच्या वेशात एक छोटा बदल झालेला आहे. त्यामुळे वर-वधू मॅचिंग मास्कची मागणी करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children's craze for cartoon mask