प्रेमाच्या आणाभाका एकीशी, लग्न मात्र दुसरीशीच...शिक्षिकेची फसवणुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

सोहेलने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. तिने नकार दिला असता लग्नाचे आमिष दाखवायला लागला. सोहेलच्या प्रेमात युवतीने त्याच्या सांगण्यावरून आई-वडिलांचे घर सोडले आणि सोहेलसोबत राहायला लागली. सोहेलने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारसुद्धा केला. विरोध केल्यास तिला देहव्यवसायात ढकलण्याची धमकी द्यायचा. घर सोडल्यामुळे ती परतही जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ती सोहेलचा अत्याचार सहन करीत होती.

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थपित केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या युवकाविरुद्ध 23 वर्षीय युवतीने मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी या तक्रारीची नोंद अदखलपात्र गुन्हा म्हणून (एनसी) केली. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा - प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन...

युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सहा वर्षांपूर्वी पीडित युवती प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, कॉम्प्युटर क्‍लासमधील एका मैत्रिणीने तिचा मामेभाऊ आरोपी सोहेल शाहीद कुरैशी (वय 27, रा. मानकापूर) याच्याशी ओळख करून दिली. सोहेल वडिलाच्या नावे असलेला पोल्ट्री फार्म चालवितो. दोघांची मैत्री झाली. नंतर सूत जुळले. सोहेलने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. तिने नकार दिला असता लग्नाचे आमिष दाखवायला लागला. सोहेलच्या प्रेमात युवतीने त्याच्या सांगण्यावरून आई-वडिलांचे घर सोडले आणि सोहेलसोबत राहायला लागली. सोहेलने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारसुद्धा केला. विरोध केल्यास तिला देहव्यवसायात ढकलण्याची धमकी द्यायचा. घर सोडल्यामुळे ती परतही जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ती सोहेलचा अत्याचार सहन करीत होती.

सोहेलने केले दुसरीशी लग्न
गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून सोहेलने युवतीसोबत अचानक संबंध तोडले. फोनही बंद करून ठेवला. त्यामुळे युवती त्याच्या घरी पोहचली असता त्याने दुसऱ्या युवतीशी लग्न केल्याचे तिला कळले. सोहेल व त्याच्या कुटुंबीयांना विचारणा केली. त्यानंतर तिने मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रारीत स्पष्टपणे लैंगिक शोषण केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी त्या तक्रारीवर केवळ कलम 417 (विश्‍वासघात करणे) नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार
मानकापूर पोलिसांनी आरोपी सोहेल कुरैशी याच्यासोबत "मैत्रीपूर्ण' व्यवहार करून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. त्यामुळे पोलिसांची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचेही युवतीने सांगितले.

मर्जीने प्रियकराशी शारीरिक संबंध

पीडित युवतीने स्वतःच्या मर्जीने प्रियकराशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. तसेच लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर लग्न न केल्याने विश्‍वासघात-फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जर त्या युवतीवर अनैसर्गिक अत्याचार आरोपीने केला तर तिने पुन्हा त्या युवकाशी शारीरिक संबंध का प्रस्थापित केले? असा प्रश्‍न आहे.
- वजीर शेख (ठाणेदार, मानकापूर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitting with girl by married man