चिनी वस्तू आता नकोच, तब्बल एवढ्या टक्‍के नागरिकांनी टाकला बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

93 टक्के नागरिकांनी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटूंनी चीनच्या वस्तूंच्या जाहिराती करू नयेत, असे मत नोंदविले आहे. भारत-चिनी कंपन्यांमध्ये झालेले करार रद्द करण्यात यावे, असे मत 96.5 टक्के नागरिकांनी व्यक्त केले. सर्वेक्षणावरून भारतीय नागरिकांनी चीनविरोधात मोहीम उघडण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, असेही भरतीया म्हणाले. 

नागपूर : चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर हल्ला केल्यानंतर 98.8 टक्के भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयाचे समर्थन केल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. 19 ते 27 जून या कालावधीत देशभरातील सर्वच राज्यात एकाच वेळी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात नऊ हजार 735 नागरिकांनी भाग घेऊन मते नोंदवली. 

अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) चीनसोबतच्या विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकणारे प्रश्‍न नागरिकांना विचारण्यात आले. त्यातील 90 टक्के नागरिकांनी चीनविरुद्ध एकजूट होऊन प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे मत व्यक्त केले. नऊ दिवस चालविलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात व्यापारी, लघु उद्योजक, शेतकरी, फेरीवाले, ग्राहक, स्वयंरोजगार, महिला उद्योजक, गृहणी, नोकरी करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांमधील नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

सर्वेक्षणात नऊ प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यात चीनने भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कारवाईला 95.8 टक्के नागरिकांनी चुकीचे मानले आहे. या हल्ल्यामुळे 20 भारतीय सैन्य शहीद झाल्याने दुःखी असल्याचे 99.9 टक्के नागरिकांनी सांगितले. आता चीनला धडा शिकवायला हवा, असे 97 टक्के नागरिकांनी म्हटले आहे. 

भारतीय सैन्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे 98.8 टक्के नागरिकांनी सांगितले. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी 98.8 टक्के नागरिकांनी सकारात्मकता दर्शवली आहे. चिनी वस्तू खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकण्याचे 97.8 टक्के नागरिकांनी सांगितले आहे. 93 टक्के नागरिकांनी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटूंनी चीनच्या वस्तूंच्या जाहिराती करू नयेत, असे मत नोंदविले आहे. भारत-चिनी कंपन्यांमध्ये झालेले करार रद्द करण्यात यावे, असे मत 96.5 टक्के नागरिकांनी व्यक्त केले. सर्वेक्षणावरून भारतीय नागरिकांनी चीनविरोधात मोहीम उघडण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, असेही भरतीया म्हणाले.

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार

11 हजार नागरिकांना पाठविले सर्वेक्षण फॉर्म

कॅटने देशातील सर्व राज्यांतील अंदाजे 11 हजार नागरिकांना सर्वेक्षण फॉर्म पाठविले होते. त्यापैकी नऊ हजार 735 नागरिकांनी मत नोंदविले आहे, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens support boycott on Chinese goods