esakal | मनोरुग्णालयातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात लिपिक दोषी, आरोग्य उपसंचालकांकडे अहवाल सादर
sakal

बोलून बातमी शोधा

clerk is accused in physical abused in case in mental hospital nagpur

महिनाभरापूर्वी मनोरुग्णालयातील एका लिपिकाने मोबाईलवरून एका परिचारिकेला अश्लील संदेश पाठवला. यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.

मनोरुग्णालयातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात लिपिक दोषी, आरोग्य उपसंचालकांकडे अहवाल सादर

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात महिनाभरापूर्वी घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत लिपिक दोषी आढळला असल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. विशाखा समितीच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना झोडे यांच्या नेतृत्वात चौकशी करण्यात आली. यात लिपिक दोषी आढळला. डॉ. झोडे यांनी हा अहवाल वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्याकडे सादर केला. यानंतर आरोग्य उपसंचालक यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. विशेष असे की, लिपिक अखेरपर्यंत चौकशी समितीसमोर हजर झाला नसल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

महिनाभरापूर्वी मनोरुग्णालयातील एका लिपिकाने मोबाईलवरून एका परिचारिकेला अश्लील संदेश पाठवला. यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. येथील विशाखा समितीमार्फत ४ आणि ६ जानेवारी चौकशी केली. यावेळी सलग दोन सुनावण्यांसाठी चौकशी पथकासमोर लिपिकाला हजर राहण्याचा निरोप देण्यात आला. परंतु, हजर न झाल्याने अखेर अल्टिमेटम दिला होता. तक्रारीपूर्वी परिचारिका आणि लिपिक या दोघांचेही व्हाट्सअ‌ॅपवरील या अश्लील संदेशावरून मनोरुग्णालय परिसरात भांडण झाले होते. फिर्यादी आणि आरोपी लिपिक या दोघांनी मोबाईलवर काही काळ मेसेजेसची देवाणघेवाण केली असल्याचा दावा येथील सूत्रांकडून झाला होता. अचानक काहीतरी चूक झाली आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. तक्रारदाराचे म्हणणे नोंदविण्यात आले आणि आरोपी सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही. आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल यांच्याकडून चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळाले.