esakal | 'इको'च्या प्रतीक्षेत संपले ऑक्सिजन, धावाधाव करूनही मिळाले नाही सिलिंडर

बोलून बातमी शोधा

patients did not got oxygen cylinder even in emergency in nagpur super specialty hospital}

मेडिकलमध्ये या तरुणीला किडनीच्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्ण तरुणी सैन्य कुटुंबातील आहे. गुरुवारी मेडिकलमधून सुपर स्पेशालिटीत इको करण्यासाठी पाठविण्यात आले. रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता होती; म्हणून सिलिंडरदेखील सोबत होते.

'इको'च्या प्रतीक्षेत संपले ऑक्सिजन, धावाधाव करूनही मिळाले नाही सिलिंडर
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सैनिकाच्या कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी सुपर स्पेशालिटीत इकोच्या प्रतीक्षेत होती. तरुणीला ऑक्सिजन सिलिंडर लावले होते. मात्र, प्रतीक्षा सुरू असतानाच सिलिंडरमधील ऑक्सिजन संपले. यामुळे या तरुणीचा जीव कासावीस झाला. वेळेत ऑक्सिजन मिळाले नाही. सुपरमध्ये धावाधाव केली; परंतु कोणीही मदत न केल्याने अखेर मेडिकलमध्ये परत जावे लागले. 

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

मेडिकलमध्ये या तरुणीला किडनीच्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्ण तरुणी सैन्य कुटुंबातील आहे. गुरुवारी मेडिकलमधून सुपर स्पेशालिटीत इको करण्यासाठी पाठविण्यात आले. रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता होती; म्हणून सिलिंडरदेखील सोबत होते. दुपारी साडेबारा वाजता सुपर स्पेशालिटीत ती इकोच्या प्रतीक्षेत होती. गर्दी असल्यामुळे इकोला वेळ लागला. अचानक ऑक्सिजन सिलिंडर रिकामे झाल्याचे कळले. या तरुणीला त्रास सुरू झाला. येथे परिवारातील सदस्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुसरे सिलिंडर बसविण्यास यावे, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यांचे म्हणणेही कोणी ऐकले नाही. अवघ्या पाच मिनिटांत तरुणीची प्रकृती खालावली. कोणीही मदत करण्याच्या तयारीत नसल्याने अखेर प्रतीक्षा न करता कुटुंबीयांनी तरुणीला मेडिकलमध्ये आणले. येथे भरती असलेल्या वॉर्डात तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर बसविले. सुमारे दोन तासांनंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

या प्रकरणासंदर्भात कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नाही. रुग्ण रुग्णालयात असल्यानंतर डॉक्टर त्याच्याकडे लक्ष देतातच. मात्र, या घटनेची माहिती घेतल्यानंतर सांगता येईल. असा प्रकार अचानक घडल्यास काळजी घेतली गेलीच पाहिजे. शुक्रवारी चौकशी केल्यानंतरच यावर मत व्यक्त करता येईल. 
-डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर