कोरोनामुळे संगणक इन्स्टिट्यूट झाले बंद; होतकरु विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान; प्रशिक्षणापासून वंचित

मंगेश गोमासे
Wednesday, 16 September 2020

विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा यासाठी गेल्या १० वर्षात गल्लोगल्ली कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट सुरु झाल्याचे चित्र दिसून येते. या इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सेससाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. घ

नागपूर : कोविड - १९ मुळे मागील सहा महिन्यांपासून कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट्स बंद आहेत. त्यामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा यासाठी गेल्या १० वर्षात गल्लोगल्ली कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट सुरु झाल्याचे चित्र दिसून येते. या इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सेससाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. घरी लॅपटॉप आणि संगणक नसल्याने इन्स्टिट्यूटमध्ये संगणकावर प्रशिक्षण घेत, विद्यार्थी प्रशिक्षित होतात. त्या आधारावर अनेक तरुणांना नोकरीही मिळाली आहे.

क्लिक करा - CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या

इन्स्टिट्यूटमध्ये साधारणपणे तरुण टॅली इआरपी9 आणि जीएसटी, मायक्रोसॉफ्ट एक्‍सेल, हार्डवेअर, नेटवर्किंग व लॅपटॉप रिपेअरिंग, सी, सी प्लस प्लस, जावा आणि Python या प्रोग्रॅमिंग लॅग्वेजेसचा समावेश आहे. याशिवाय लॅपटॉप रिपेअरिंग, मायक्रोसॉफ्ट एक्‍सेलचेही प्रशिक्षण या इन्स्टिट्यूटमधून दिल्या जातात. याचा फायदा तरुणांना एखाद्या ऑफिस, सीए आणि इतर ठिकाणी किमान दहा हजाराची नोकरी मिळविण्यासाठी होत असतो. 

त्यामुळे हे कोर्सेस तरुणांना वरदान ठरत असतात. मात्र, मार्च महिन्यापासून टाळेबंदीमुळे शाळा महाविद्यालयासह सगळ्या संस्था बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध संगणकीय अभ्यासक्रम करता येणे शक्य झाले नाही. यामुळे बऱ्याच तरुणांना नोकरीपासून वंचित व्हावे लागत आहे.

विद्यार्थ्यांना विविध संगणकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण व प्रशिक्षण देणे विद्यार्थ्यांमधील उत्साह, उर्जा टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना नवनवीन तंत्रांची माहिती करून देण्यासाठी सॉफ्टसेन्स टेक्‍नोसर्व्ह (इंडिया) प्रा. लिमिटेड ने विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्यूटर हार्डवेअर, नेटवर्किंग तसेच, प्रोग्रामिंग लॅग्वेजचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे. 

अधिक माहितीसाठी -'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर

त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सॉफ्टसेन्सच्या अधिकृत फेसबुक पेज व ट्वीटर हँडल @thesoftsense वर जाऊन या मोफत प्रशिक्षण वेळापत्रकाची सविस्तर माहिती प्राप्त करता येईल. सोबत गुगल फॉर्मची लिंक देण्यात आली असून त्याद्वारे संबंधित मोफत अभ्यासक्रमासाठी नोंदणीदेखील करता येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले जाणार आहे, असे सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्ह (इंडिया) प्रा. लि.चे संचालक डॉ. विशाल लिचडे म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Computer institute are closed due to corona read full story