esakal | चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे; पाखरांसाठी जलपात्राची संकल्पना, वाढत आहे सजकता

बोलून बातमी शोधा

The concept of a water pot for birds Nagpur rural news

चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढावा, त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू व्हावे, यासाठी पक्षिप्रेमी प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये सजगता वाढत आहे कुठे. निसर्गमित्र दुधी भोपळ्यापासून पक्ष्यांसाठी घरटी तयार करीत आहेत.

चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे; पाखरांसाठी जलपात्राची संकल्पना, वाढत आहे सजकता
sakal_logo
By
मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमणी पाखरांच्या घटत्या संख्येस कारणीभूत ठरत आहे. चिमण्या अंगणातून गायब झाल्या आहेत. चिमण्यांशी आपल्या आठवणी जुळलेल्या असतात. त्यामुळे मन हळवे होते. ‘चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे’ हे ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आपसूक ओठांवर येते. चिमण्या पुन्हा परत याव्या यासाठी जलपात्राची संकल्पना काही महिला राबवत आहेत.

चिमणी पाखरांसाठी जलपात्राची संकल्पना राबविणाऱ्या सावनेर नगरपालिका अभ्यंकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता झाडे सांगतात की, एक घास चिऊताईचा म्हणून आई आपल्या बाळाला एक घास मायेने भरवते. मात्र, चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे. कुठेतरी बालपणाच्या आठवणीची चिऊताई जोडली गेलेली आहे.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढावा, त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू व्हावे, यासाठी पक्षिप्रेमी प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये सजगता वाढत आहे कुठे. निसर्गमित्र दुधी भोपळ्यापासून पक्ष्यांसाठी घरटी तयार करीत आहेत. तर कुठे प्लॅस्टिकची बाटली, मातीचे भांडे आदींचे घरीच जलपात्र तयार करून घराच्या छतावर तर कुणी खिडकीला किंवा झाडाच्या फांदीला लटकवून ठेवताना दिसत आहेत.

यासाठी मुख्याध्यापिका अनिता झाडे तसेच शिल्पा बसवार, सोनाली उमाटे, वैशाली घटे, पूनम कोहळे, प्रीती डोईफोडे, सुनीता जुनघरे, भाविका लाखानी, स्नेहल नागरे, विविधा उमाटे, अमिता धवड आदी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या भगिनी प्रयत्नशील आहेत.

जाणून घ्या - आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार

चिमण्यांचे संरक्षण ही काळाची गरज

उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात वाढ झाली की, तहानेने व्याकूळ झालेल्या चिमणी पाखरांची तहान भागविण्यासाठी येथील अनेक भगिनी हा उपक्रम राबवीत असतात. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मीळ झाले आहे. कविता, बडबड गीते, पुस्तकांवरील चित्रे यातच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांचे संरक्षण ही काळाची गरज झाली आहे.