२० लाख कोटी गेले कुठे?

राजेश चरपे
Saturday, 15 August 2020

घोषित केलेले पॅकेज गेले कुठे अशी विचारणा यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारला करण्यात आली.

नागपूर :  कोरोना व लॉकडाउनमुळे घसरलेली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मोदी सरकारने घोषणा केलेले २० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे, याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने  शुक्रवारी भाजपच्या गणेशपेठ येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव बंटी शेळके, शहर युवक काँग्रेस  अध्यक्ष तौसीफ खान,  प्रदेश युवक  काँग्रेसचे  सचिव सागर चव्हाण आणि  वसीम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. घोषित केलेले पॅकेज गेले कुठे, १८ हजार सातशे कोटी कुठल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले, दुग्धव्यवसायाचे १५ हजार कोटी, अडीच हजार कोटी मत्सव्यवसायाचे काय झाले अशी विचारणा यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारला करण्यात आली.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

आंदोलनात स्वप्निल ढोके, हेमंत कातुरे, राज बोकडे, राज संतापे,मुबाशिर अहमद, फिरोज खान,अतुल मेश्राम, कुणाल खड्गी, अभिषेक पाटील, विजय मिश्रा, शोएब अंसारी,आदित्य जेठे, शोएब खान, केदार गुप्ता, प्रथम उईके, आशिष ब्राम्हणे, योगेश वहाने,अमन लुटे, आदी सहभागी झाले होते. 

(संपादन : प्रशांत राॅय)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress asked, Where did 20 lakh crores go?