
नागपूर : काँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना चार वर्षे थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच आता त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ओबीसींसाठी राखीव असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. याकरिता १६ जागांसाठी आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली.
सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे, पूनम जाधव, अर्चना भोयर, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, अर्चना गिरी, सुचिता ठाकरे, कैलास राऊत, भोजराज ठवकर, योगेश देशमुख, समीर उमप, ज्योती शिरसकर, रेवती बोरके, ज्योती राऊत यांचा समावेश आहे. पक्षनिहाय विचार केल्यास काँग्रेस ७, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व एक शेकापच्या सदस्याचा समावेश आहे.
उपाध्यक्ष मनोहर कुंभारे केळवद म्हणून विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघ आता महिलांसाठी राखीव झाला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते पारडसिंगाचे सदस्य होते. त्यांचा मतदारसंघ महिलेस गेला आहे.
महिलांसाठी आरक्षित सर्कल -
सावरगाव, पारडसिंगा, वाकोडी, केळवद, करंभाड, वडोदा, डिगडोह, इसासनी डिगडोह
हे सदस्य बचावले -
योगेश देशमुख (अरोली) , कैलास राऊत (बोथिया पालोरा), अनिल निधान (गुमथळा), राजेंद्र हरडे (नीलडोह), भोजराज ठवकर (राजोला) समीर उमप (येनवा) हे सदस्य बचावले असून त्यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.
महिलांच्या जागी महिलाच -
ज्योती शिरसकर (वाकोडी), अर्चना भोयर (करंभाड), अवंतिका लेकुरवाळे (वडोदा), देवका बोडके (सावरगाव), अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी) हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून येथे महिलाच सदस्य आहेत. त्यामुळे यांनाही परत संधी मिळू शकते.
हे झाले खुले -
ज्योती राऊत (गोधनी रेल्वे), पुनम जोध (भिष्णूर सर्कल),सुचिता ठाकरे (डिगडोह) या मतदारसंघात महिला निवडून आल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आता पुरुष सदस्यांना येथून लढण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.