मजनुगिरी करणाऱ्या पोलीसाचीच धुलाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

शहर पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपत्तीजनक मेसेज पाठविणाऱ्या वाहतूक पोलिस हवालदाराची चांगलीच धुलाई करण्यात आली. ही घटना इंदोरा परिसरातील पोलिस कार्यालयात घडली. आरडाओरड झाल्याने एसीपी आणि पोलिस निरीक्षकाने मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. परंतु याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस दलात चर्चा रंगली होती.

नागपूर : सद्‍रक्षणाय, खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्‍य असलेले पोलीसच मजनुगिरी करीत इतर ोणाची नव्हे पालीस विभागातच कार्यरत असलेल्या महिला पोलीसाची छेड काढीत असेल तर सामान्यांनी अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून? नागपुरच्या एका भागात नुकताच हा प्रकार घडला आणि त्या महिला पोलीसाने पुढचा मागचा विचार न करता आपल्या पतीसह त्या मजनु पोलीसाची मस्त धुलाईकेली.
शहर पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपत्तीजनक मेसेज पाठविणाऱ्या वाहतूक पोलिस हवालदाराची चांगलीच धुलाई करण्यात आली. ही घटना इंदोरा परिसरातील पोलिस कार्यालयात घडली. आरडाओरड झाल्याने एसीपी आणि पोलिस निरीक्षकाने मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. परंतु याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस दलात चर्चा रंगली होती.

सविस्तर वाचा - मिस्टर परफेक्‍शनिस्टच्या चित्रपटात दिसले असते स्लम सॉकर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरा भागातील एका कार्यालयात पोलिस हवालदार नंदू कार्यरत आहे. तो वसुली आणि ड्युटी लावण्याचे काम करतो. तो अधिकाऱ्यांचा आर्थिक व्यवहार सांभाळतो. त्यांची पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर वाईट नजर होती. गेल्या अनेक दिवसांपासून नंदू तिला मानसिक त्रास द्यायचा. विनाकारण त्या महिला कर्मचाऱ्याची ड्युटी त्रास होईल अशा ठिकाणी लावायचा. एवढेच नव्हे तर त्या महिला पोलिसाला नंदू आपत्तीजनक मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवत होता. नंदूचा त्रास वाढत असल्याने तिने पोलिस दलात असलेल्या पतीला सांगितले. नंदूचे मोबाईलवर आलेले मेसेजही दाखविले. दोघाही पती-पत्नीने यापूर्वी नंदूला समज दिली होती. परंतु त्याने महिला कर्मचाऱ्याला त्रस्त करणे सुरूच ठेवले होते.
नंदुची धुलाई टॅग लाईन व्हायरल
सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास महिला कर्मचारी आणि तिचा पती इंदोरा ट्रॅफिक कार्यालयासमोर आले. नंदू बाहेर येताच त्याला घेरले. त्याला मेसेज पाठविल्याबाबत जाब विचारला. साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे नंदूने दोघांनाही तोरा दाखवला. मात्र, यावेळी महिला पोलिस कर्मचाऱ्यांने आणि तिच्या पतीने नंदूची यथेच्छ धुलाई केली. हवालदाराला मारहाण होत असल्याची बातमी एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहचली. त्यांनी लगेच बाहेर येऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना शांत केले. दरम्यान, पीआय साहेबही तेथे पोहचले. दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलिस पती-पत्नीची समजूत घातली. हा प्रकार तासाभरात वाऱ्यासारखा पोलिस विभागात पसरला. "नंदूची धुलाई' या टॅगलाईनने अनेक वाहतूक पोलिसांच्या गृपवर हे वृत्त फिरत होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cop beaten by woman for inappropriate behavior