कोरोना ब्रेकिंग : नागपुरातील 'धारावी'त होतोय ब्लास्ट; आठवे शतक पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

गुरुवारी 38 रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील एकूण बाधितांची आकडा 815 वर गेला आहे. एकट्या नाईक तलाव परिसरात 35 रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी भरतनगर, झिंगाबाई टाकळी, विश्‍वकर्मानगर या वस्त्या कोरोनाच्या नकाशावर आल्या होत्या. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नागपूर : कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यापासून नागपुरात रुग्ण संख्या फार कमी होती. तसेच मृत्यूदरही नाही सारखाच होता. मात्र, मागील दोन महिन्यांत शहरातील रुग्णसंख्येत अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली होती. मागील काही दिवसांपासून दिवसाला 30 रुग्ण वाढत असल्याने नागपूरची स्थिती मुंबईतील धारावी सारखी झाली आहे. येथील रुग्णसंख्या 815 वर गेली आहे. गुरुवारी 38 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण बाधित आठशेवर गेले आहेत. 

उपराजधानीत दर दोन दिवसांनंतर एका वस्तीत कोरोनाचा उद्रेक होत आहे. सुरुवातीला सतरंजापुरा, मोमिनपुरा, शांतीनगर आणि आता नाईक तलाव. नाईक तलाव परिसरात एकाच दिवशी 22 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. गुरुवारी यात आणखी 35 रुणांची वाढ झाली आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील तीन रुग्णांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे शहरातील बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे.

जाणून घ्या - मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...

गुरुवारी 38 रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील एकूण बाधितांची आकडा 815 वर गेला आहे. एकट्या नाईक तलाव परिसरात 35 रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी भरतनगर, झिंगाबाई टाकळी, विश्‍वकर्मानगर या वस्त्या कोरोनाच्या नकाशावर आल्या होत्या. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

बुधवारी नवीन बाधितांमध्ये मार्टिननगरसह विश्वकर्मानगरचा समावेश होता. झिंगाबाई टाकळी, नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील रुग्ण आहेत. भरतनगर, मोमिनपुरा, न्यूरॉन्स रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, हंसापुरीतील रुग्णांसह इतरही भागातील काही रुग्णांचा समावेश आहे. विशेष असे की, शहरात प्रथमच भरतनगर, झिंगाबाई टाकळी, विश्वकर्मानगर या वस्त्यांचा समावेश आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यांपासून तर सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतचे बाधित मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. 

मंगळवारी एम्स येथील प्रयोगशाळेतून 28 जणांना कोरोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. नीरी, एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेतील अहवालातून दिवसभरात पस्तीस जणांना बाधा झाली असल्याचे पुढे आले. तर एका खासगी रक्तपेढीतही एकाला बाधा झाल्याचे पुढे आले. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात घेण्यात आले आहे. प्रशासनाने उपराजधानीतील विविध कोरोनाबाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांना विलगीकरण केंद्रात खबरदारीचा उपाय म्हणून ठेवले होते.

सविस्तर वाचा - टणटणटण...नागपूर जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार, वाचा

नाईक तलाव हॉटस्पॉट

शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत प्रचंड वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे शहरातील वाधितांचा आकडा वाढायला सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली असताना नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातारवरण पसरले आहे. गुरुवारी 38 रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाने आठशेचा आकडा पार केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona completes eighth century in Nagpur