esakal | टणटणटण...नागपूर जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

school might open on 26 june in nagpur district

कोरोनामुळे पालकांची मानसिकता अद्यापही मुलांना शाळेत पाठविण्याची झालेली नाही. भीतीपोटी पालकांकडून मुले शाळेत पाठविण्यात येतील काय? हा प्रश्‍न आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्यातरी, त्यात विद्यार्थी येतील काय? याबाबत संभ्रम आहे.

टणटणटण...नागपूर जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार, वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या 1500 शाळा आहेत. याशिवाय बऱ्याच खासगी शाळांचा समावेशही आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यात त्याची तीव्रता कमी आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षणाधिकारी ठाम असल्याचे समजते.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश निशंख पोखरियाल यांनी शाळा सुरू करण्याची अद्याप घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कुठलेच दिशानिर्देश आलेले नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी 26 जूनला शाळा सुरू करण्यासंदर्भात तयारी सुरू केली आहे.

दुसरीकडे कोरोनामुळे पालकांची मानसिकता अद्यापही मुलांना शाळेत पाठविण्याची झालेली नाही. भीतीपोटी पालकांकडून मुले शाळेत पाठविण्यात येतील काय? हा प्रश्‍न आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्यातरी, त्यात विद्यार्थी येतील काय? याबाबत संभ्रम आहे. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळांची पहिली घंटा 26 जूनलाच घेण्याची तयारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. अद्याप सरकारकडून त्याबाबत कुठलेही दिशानिर्देश आले नसल्याने तयारी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांशी चर्चाही केल्याचे समजते.

राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनला पश्‍चिम महाराष्ट्र तर 26 जूनला विदर्भातील शाळा सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, केंद्राकडून अद्याप यासंदर्भात कुठलेच दिशानिर्देश आलेले नाहीत.