हे काय घडतंय, हिंगणा एमआयडीसीत "कोरोनाचा कारखाना', कारण ठरली ही कंपनी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

हिंगणा एमआयडीसी परिसरात झपाटयाने कोरोनाचा प्रसार होत आहे. तालुक्‍यातील संख्या आता 31 वर पोहोचली आहे. बहुतांश रूग्ण एमआयडीसीत कामगार म्हणून काम करतात. आतापर्यंत हा परिसर कोरोनामुक्‍त होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर लगेच कारखाने सुरू झाले आणि संसर्गाला मोठया प्रमाणात सुरूवात झाली. यासाठी हसीब फार्मास्युटिकल कंपनी कारणीभूत ठरली. कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या कारखान्यात काय व्हायचे, त्यासाठी वाचा...

 हिंगणा एमआयडीसी/ वानाडोंगरी (जि.नागपूर) : सध्या सुरु असलेल्या कोरोना साथकाळात दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्याएमआयडीसीतील हसीब फार्मास्युटिकल कंपनीवर तहसीलदार संतोष खांडरे यांनी नोटीस बजावून पुढील आदेशापर्यंत कंपनी बंदचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : अबब ! माया झाली "बारा' बछडयांची माय !!

जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
ग्रामपंचायतल भीमनगर येथे 9 जुनला मिळालेले तिन पॉझिटीव्ह रुग्ण हे चौकशीअंती, हसीब फार्मास्युटिकल कंपनी एमआयडीसी हिंगणा येथे काम करत असल्याचे आढळून आले.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार व तहसीलदार संतोष खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार ज्योती भोसले, मंडळ अधिकारी राजेश चुके, तलाठी आर.एच.सोनकुसरे व एस.एन. तिवारी यांच्या पथकाने हसीब फार्मास्युटिकल कंपनीत पाहणी केली. या कंपनीत130 कामगार काम करतात . त्यातील50 कामगार पॅकेजींग विभागात काम करत होते.

आणखी वाचा : धंदयावर बसण्याची धमकी देणारी "लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळयात

कंपनीत नियमांचा फज्जा
मात्र कोरोनासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार मास्कचा वापर, वेळोवेळी साबणाने हात धुणे, सहा फूट अंतराचे पालन या गोष्टी तेथे आढळल्या नाहीत. त्यामुळे साथ रोगप्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तहसीलदार संतोष खांडरे यांनी नोटीस बजावून 11 जुन ते पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद करण्याची कारवाई केली. इतरही अनेक कंपन्यांमध्ये नियम पाळले न गेल्यास, याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार संतोष खांडरे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona factory" from Hingana MID, because this company ...