हिंगण्याच्या दारावरही कोरोनाची टकटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

एमआयडीसी परिसरातील लोकमान्यनगरातील 60 वर्षीय इसमाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलिस व हिंगणा तहसीलदार त्या परिसरात पोहोचले असून हा परिसर सील करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होऊ शकते.

हिंगणा (नागपूर) : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिंगसारखे उपाय योजल्यानंतरही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. एक-दोन दिवसात तर त्याचे प्रमाण धडकी भरवणारेच आहे. दररोज नवीन वस्त्यांचा समावेश कोरोना संसर्ग यादीत होत आहे. आणि या वस्ती सील होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लोक नोकरी-व्यवसाय सोडून घरी बसले होते. मात्र पोटाचा प्रश्‍न अधिक मोठास असतो. त्यामुळे गेल्या आठवडयापासूनच नोगरिक घरा बाहेर पडून आपल्या कामधंद्याला लागले आहेत आणि नेमका त्याच दरम्यान किंबहुना त्यामुळेच कोरानाचा आकडा वाढतोच आहे.
एमआयडीसी परिसरातील लोकमान्यनगरातील 60 वर्षीय इसमाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलिस व हिंगणा तहसीलदार त्या परिसरात पोहोचले असून हा परिसर सील करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होऊ शकते.

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन

60 वर्षीय इसम हा खानदेश (मराठवाडा)येथून काही दिवसांपूर्वी लोकमान्यनगर येथे त्याच्या मुलाकडे आला होता. त्याला क्‍वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले होते. त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आहे यामुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive in Hingana MIDC also