कोरोनामुळे स्थिती गंभीर! ऑक्सिजन संपत आले तरी बेड मिळेना, कर्णबधिर बाधिताचा ९ तास संघर्ष; फ्रंटलाइन वर्करही वाऱ्यावर

corona positive patient not got bed in nagpur
corona positive patient not got bed in nagpur

नागपूर : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दररोज साडेतीन ते पावणेचार हजारांची भर पडत आहे. परिणामी उपचारांसाटी मोठी धावाधाव होत आहे. आज तर हद्दच झाली! एका २७ वर्षी कर्णबधिर तरुणाला बेडसाठी तब्बल साडेनऊ तास इकडून तिकडे फिरावे लागले. तो रुग्णवाहिकेतच पडून होता. अखेर नऊ तासांच्या संघर्षानंतर त्याला बेड मिळाला. या घटनेने महानगरपालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. 

शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यादृष्टीने महापालिकेची कुठलीही तयारी नसल्याचे चित्र आहे. शहरातील एका २७ वर्षीय कर्णबधिर तरुणाला कोरोनाची बाधा झाली. गंभीर अवस्था असल्याने त्याला रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन लावला होता. त्यांच्यासोबत दिव्यांग मावशी व कर्णबधिर वडील व बहिणीलाही अ‌ॅम्बुलन्समध्ये एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकावे लागले. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाने २७ वर्षीय कर्णबधिर रुग्णाला चांगलेच फिरवले. अ‌ॅम्बुलन्समधील ऑक्सिजनही संपुष्टात येत असतानाही बेड न मिळाल्याने दिव्यांग मावशी, कर्णबधिर वडीलही मानसिकरित्या खचले. अखेर नागपूर सिटिझन्स फोरमचे अभिजित झा व प्रतीक बैरागी यांनी तरुणाला बेड मिळवून दिले. 

विशेष म्हणजे, मनपाच्या एका फ्रंटलाईन वर्करलाही बेडसाठी संघर्ष करावा लागल्याने महापालिकेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी आशीनगर झोनमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. त्याला बेडची गरज होती. परंतु, महापालिका प्रशासनाला त्याच्यासाठीही बेडची व्यवस्था करण्यात चांगलीच कसरत करावी लागली. अनेक तासांच्या संघर्षानंतर मेडिकलमध्ये त्याला बेड मिळाला. परंतु, त्यासाठी मेडिकलकडे दोन तास विनवण्या कराव्या लागल्याचे सूत्राने नमुद केले. 

नगरसेवकांचाही संताप -
महापालिकेच्या सभागृहात बेडवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेविका आभा पांडे यांनी प्रशासन बेडच्या माहितीबाबत अद्यावत नसल्याचा आरोप केला. कोविड रुग्णांना औषधे मिळत नसल्याचे नगरसेविका दिव्या धुरडे म्हणाल्या. माजी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासन गंभीर नसल्याचे नमुद केले. नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी प्रशासन बेजबाबदार असल्याचा आरोप केला. 

महापालिकेनुसार उपलब्ध बेड - 

हॉस्पिटल बेडची संख्या ऑक्सिजन बेड आयसीयू व्हेंटीलेटरयुक्त बेड 
खासगी हॉस्पिटल (७९) २९३६ १८३९ ९९४ २६१ 
शासकीय हॉस्पिटल(८) १५१५ ११५२ ३१९ २७१ 

बेडबाबत नेमकी माहिती मिळत नाही - 
नक्की कुठे आणि किती बेड आहेत अशी विचारणा केली असता योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना अ‌ॅम्बुलन्स घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्यामुळे भीती आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते. 

गोळ्या वेळेवर पोहोचत नाहीत - 
घरी असणाऱ्या बाधितांपर्यंत आठ-आठ दिवस कर्मचारी पोहोचत नसल्याने हे बाधित गोळयांसाठी बाहेर पडत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. 

होम आयसोलेशनमुळे रुग्णवाढ - 
चाचणी केंद्रे वाढली तरी व्हीएनआयटी, पाचपावली व आमदार निवास असे तीनच विलगीकरण केंद्र असल्याने हजारो बाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याने रुग्णवाढ होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com