नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट होतोय ; आणखी पाच परिसर केले सील

file photo
file photo

नागपूर : महानगरातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशेपर्यंत पोहोचली असून महापालिकेने आज बाधित आढळून आलेले परिसर सील केले आहेत. यात रामदासपेठ लेंड्रा पार्क, हसनबाग, रमानगर, हिंदुस्थान कॉलनी, प्रशांतनगरातील परिसराचा समावेश आहे.

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 35 मधील रमानगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. रमानगरच्या दक्षिण पश्‍चिमेस मोहनलाल केसरी, दक्षिण पूर्वेस मीरा मून यांचे घर, उत्तर पूर्वेस राजेश गावंडे यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस दौलत नारायणे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग 27 मधील हसनबाग येथील उत्तरेस नईमुद्दीन जहरुद्दीन यांचे घर, उत्तर पूर्वेस जावेद अहमद यांचे घर, पूर्वेस शहदा खातून यांचे घर, दक्षिण पूर्वेस अमनाबी शेख यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस वतन आइस्क्रीम पार्लर, उत्तर पश्‍चिमेस चिश्‍तिया मेडिकल स्टोर्सपर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 15 मधील रामदासपेठ लेंड्रा पार्क परिसरही सील करण्यात आला. लेंड्रा पार्कच्या उत्तरेस शैलेश वेद यांचे घर, नरेंद्र काने यांचे घर, श्रीराम मराठे यांचे घर, पश्‍चिमेस विजय शर्मा व बनवारीलाल मालू यांचे घर, दक्षिणेस नास्तलकर, कविता अग्रवाल यांचे घर तसेच ओम मेंशन इमारतीपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 16 मधील प्रशांतनगरातील एन. एच. अपार्टमेंट परिसराच्या पूर्वेस बापट यांचे घर, उत्तरेस प्रकाश चतुर्वेदी ते वसंत रोटकर यांचे घर, पश्‍चिमेस प्रकाश ठाकरे यांचे घर, दक्षिण मोकळे मैदान व अजनी रोड या परिसरात निर्बंध लावण्यात आले. याच प्रभागातील हिंदुस्थान कॉलनीतील संचेती पब्लिक शाळेजवळील परिसरात पूर्वेस नाला, उत्तरेस संचेती पब्लिक स्कूल, पश्‍चिमेस आकुलकर यांचे घर, दक्षिणेस विदर्भ महिला क्रेडिक को-ऑपरेटिव्ह सोसायटीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला

प्रशांतनगरातीलच हनुमान मंदिराजवळील पूर्वेस सुमन रेसिडेन्सी, उत्तरेस हनुमान मंदिर, पश्‍चिमेस साईकृपा अपार्टमेंट, दक्षिणेस प्रशांतनगरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आले. याच झोनअंतर्गत प्रभाग 38 मधील अहिल्यानगराच्या पूर्वेस राही सभागृह, उत्तरेस नाला, पश्‍चिमेस हरिदास लोखंडे यांचे घर, दक्षिणेस गणपती अकनुलवार यांचे घरापर्यंतचा परिसरात निर्बंध लावण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com