खुशखबर! नागपूरकरांची कोरोनाची भीती होणार दूर, उपराजधानीत लवकरच लसीकरण

राजेश चरपे
Wednesday, 9 December 2020

लसीकरणाचा लाभ वैद्यकीय क्षेत्राला सर्वप्रथम दिला जाईल. नाव नोंदणी केलेल्यांची संपूर्ण माहिती ही केवळ लसीकरणाच्या नियोजनासाठीच वापरण्यात येणार आहे.

नागपूर : कोरोना विषाणूवरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेर अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. प्रारंभी करोनायोद्धे डॉक्टर्स, नर्सेस तसेच जोखमीच्या रुग्णांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरकरांची कोरोनाची भीती, चिंता लवकरच दूर होणार आहे. 

हेही वाचा - अनेकांचे घराचे स्वप्न भंगले : बांधकाम क्षेत्राला...

कोरोना विषाणू लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अश्विनी नागर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. महम्मद साजीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते. लस टोचणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केल्या जाईल. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबविण्यात येईल. लसींच्या साठ्यांसाठी सर्व केंद्रांवर शीत कपाटे उपलब्ध राहतील, अशी माहिती नागर यांनी यावेळी दिली. 

हेही वाचा - धक्कादायक! आईनेच केली दिव्यांग मुलाची हत्या, स्वतःही संपविले जीवन

काळजी घेणे आवश्यक -
लसीकरणाचा लाभ वैद्यकीय क्षेत्राला सर्वप्रथम दिला जाईल. नाव नोंदणी केलेल्यांची संपूर्ण माहिती ही केवळ लसीकरणाच्या नियोजनासाठीच वापरण्यात येणार आहे. अ‌ॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच नर्सेसचा यात समावेश करण्यात येणार आहे. कोरानावरील लसीकरण म्हणजे पूर्णतः सुरक्षा नसून नंतरच्या कालावधीतही काळजी घेणे आवश्यक आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. 

हेही वाचा - 'ते' पाच सेकंद आणि तब्बल ११९ जणांचा दुर्दैवी अंत...

जिल्ह्यामध्ये एकूण लस टोचणाऱ्यांची संख्या -

नर्सिंग स्टाफ - संख्या ५९७ (महानगरपालिकेकडील २०९ तर ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील ३८८ नर्सेस) 

जिल्ह्यात लसीकरण केंद्र  -

२ हजार ६६१ (महानगरपालिका हद्दीत ९०२ तर ग्रामीण भागात १ हजार ७५९ लसीकरण केंद्र) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine available in last week of december in nagpur says collector