esakal | "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांनी लॉजमध्ये पकडले एका जोडप्याला, अन्‌ मग झाले असे की...
sakal

बोलून बातमी शोधा

REAL

सकाळी सहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वाहनाने एक तरुणी बुरखा घालून त्या लॉजमध्ये आली. तिला बघताच "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांचा संशय आला. तरुणीच्या लागोपाठ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर एक तरूण आला व सरळ लॉजमध्ये पोहोचला. यावरून "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांचा संशय आणखीनच बळावला.

"मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांनी लॉजमध्ये पकडले एका जोडप्याला, अन्‌ मग झाले असे की...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : येरखेडा परिसरातील यशोधरानगरमध्ये पहाटे सहाच्या सुमारास रोडवरील रॉयल लॉजला महिलांनी चारही बाजूला घेरले. एका मुलीला व तिच्या प्रियकरासह पकडण्याचा प्रयत्न करत असताना प्रियकर पळण्यात यशस्वी झाला. मुलगी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या तावडीत सापडली. लगेच या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. याबाबत यशोधरानगर येथील महिलांनी एकत्र येत कामठी महिला संघाच्या वतीने ठाणेदार संतोष बाकल यांना शनिवारी (ता. 16) सायंकाळी निवेदन देऊन रॉयल लॉजच्या संचालकावर कारवाई करून लॉज चालविण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा:  सावधान !वस्त्यांमध्ये फिरताहेत संधीसाधू टोळया...

परिसरातील नागरिक त्रस्त, परवाना रद्द करण्याची मागणी
देशात सर्वत्र कोरोना महामारीने जनता त्रस्त असूनही या लॉजवर महिला-पुरुषांची ये-जा सुरू होती. याआधीही पोलिसांनी या लॉजवर कित्येकदा धाडी मारकल्या होत्या. सकाळी सहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वाहनाने एक तरुणी बुरखा घालून त्या लॉजमध्ये आली. तिला बघताच "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांचा संशय आला. तरुणीच्या लागोपाठ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर एक तरूण आला व सरळ लॉजमध्ये पोहोचला. यावरून "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांचा संशय आणखीनच बळावला.

हेही वाचा: अखेर तळीरामांनी सांभाळली अर्थव्यवस्था, दोन दिवसांत 50 कोटींची उलाढाल

बुरखाधारी महिलांच्या तावडीत
साडेसहापर्यंत लोकांनी लॉजचालकासह मुलामुलीला कोणतीही चाहूल न लागू देता, लॉजवर पाळत ठेवून होते. सुरुवातीला मुलगा लॉजमधून बाहेर येताना दिसला. त्याला लोकांनी पकडण्याचा प्रयत्न करीत असताना तरुणीसुद्धा बाहेर यायला लागली. तिला पकडण्याकरिता महिला गेल्या असता, मुलाने तेथून पळ काढला. मात्र, लॉजमध्ये आलेली ती बुरखाधारी महिलांच्या तावडीत सापडल्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कामठी महिला संघाच्या विद्याताई भीमटे, संगीता मानकर, सुनंदा डोंगरे, वर्षा पात्रिक, किरण वाहाने, छायाताई रोडगे, श्रीमती नागदेवे, व तांडेकर यांनी पोलिस निरीक्षकांना कारवाई करण्याचे निवेदन दिले. यापूर्वीच्या छाप्यात काही मुली सापडल्या होत्या, हे विशेष.
 


ते जोडपे"लव्ह इन रिलेशनशिप'मध्ये...
दोघेही बालीक असल्याने व "लव्ह इन रिलेशनशिप' या कायद्याच्या काही नियमांमुळे या प्रकरणी दिवसभरात कोणतीही कारवाई करण्यात आली नसली, तरी रॉयल लॉजच्या विरोधात यशोधरानगर वसाहतीतील महिलांकडून वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून वेळोवेळी पोलिसांचा ताफा पाठविण्यात आला. लॉजचालकाला ताकीत देण्यात आली होती. परंतु, अशा घटना समर्थनीय होऊच शकत नाही. म्हणून यावर कायमचा आळा बसावा म्हणून कारवाई करण्यात येईल.
-संतोष बाकल
ठाणेदार, नवीन कामठी पोलिस ठाणे.
 
:
 

go to top