न्यायालयाचे कामकाज उद्यापासून; नियमित सुनावणी होणार सुरु 

निलेश डोये  
Sunday, 31 January 2021

मिशन बिगीन अगेन अंतर्गतच उच्च न्यायालय आणि काही कनिष्ठ न्यायालयांना सुनावणी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पण, खटल्यांच्या संख्येमुळे कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे सुरळित नव्हते. उच्च न्यायालयात फिजीकल सुनावणी सुरू झाली आहे. 

नागपूर ः कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. खबरदारी म्हणून न्यायालयाचे कामकाजही थांबवावे लागले होते. त्यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामांना सूट देण्यात आली. काही मर्यादांसह न्यायालयीन कामकाजसुद्धा सुरू करण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्वच कनिष्ठ न्यायालयांमध्ये नियमित सुनावणी सुरू होत आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गतच उच्च न्यायालय आणि काही कनिष्ठ न्यायालयांना सुनावणी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पण, खटल्यांच्या संख्येमुळे कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे सुरळित नव्हते. उच्च न्यायालयात फिजीकल सुनावणी सुरू झाली आहे. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

आता रजिस्ट्रार जनरल यांनी साथ येण्यापूर्वीच्या स्थितीप्रमाणेच कामकाज सुरू करण्याच्या सूचना कनिष्ठ न्यायालयांच्या सर्व न्यायाधीशांना दिल्या आहेत. त्या नुसार १ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र, गोवा, दादर आणि नगर हवेली तसेच दमण व दीव या सर्व कनिष्ठ न्यायालयात नियमित सुनावणी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. सोबतच प्रकरणे निकाली काढताना सुरक्षेची प्रत्येक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संक्रमण टाळण्यासाठी उच्च न्यायालय व सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचीही सुचना करण्यात आली आहे.

जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

मुख्य न्यायमूर्तींसमक्ष सुनावणी

उच्च न्यायालयाच्या नियमित रोस्टरमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या न्यायपीठासमक्ष दिवाणी रिट याचिका, फौजदारी रिट याचिका आणि फौजदारी अपील संबंधी याचिकेवरील सुनावणी होईल. न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्यासमक्ष दिवाणी रिट याचिका, सीआरए, प्रथम अपील यावर सुनावणी होईल. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमक्ष सीआरपीसीच्या कलम ४०७ अन्वये दाखल गुन्हेगारी अर्ज आणि सर्व गुन्हेगारी अपिलांवर सुनावणी होईल.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Courts are resumed from tomorrow