ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

नरेंद्र चोरे 
Sunday, 31 January 2021

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने अचानक डोके वर काढले. उत्तर भारताकडून विदर्भाकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड गारठा वाढला आहे.

नागपूर : पावसाचा जोर ओसरताच विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत नागपूरचा पारा तब्बल सहा अंशांनी घसरला असून, गोंदिया येथे विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात थंडीचा प्रभाव आणखी तीन-चार दिवस राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने अचानक डोके वर काढले. उत्तर भारताकडून विदर्भाकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड गारठा वाढला आहे. थंडीच्या कडाक्यामुळे गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या पाऱ्यात जवळपास साडेसहा अंशांची घट झाली आहे. परवा १६.६ अंशांवर गेलेला पारा रविवारी १०.३ अंशांवर आला.

विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे ७.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. ब्रम्हपुरी (१०.७ अंश सेल्सिअस), गडचिरोली (११.४ अंश सेल्सिअस) सह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढली आहे. थंडीचा कडाका लक्षात घेता तापमानात आणखी घट अपेक्षित आहे. हवेतील गारठा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

नक्की वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप
..
चार फेब्रुवारीपासून पाऊस?

दरम्यान, हवामान विभागाने विदर्भात चार फेब्रुवारीपासून पावसाचीही शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा विदर्भातही काही प्रमाणात प्रभाव जाणवणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature dropped by six degrees in Nagpur in 2 days