esakal | भाजपच्या मुन्ना यादवसह पंजू तोतवानीवर गुन्हा; महिलेशी केले अश्‍लील चाळे

बोलून बातमी शोधा

Crime against Panju Totwani along with BJP's Munna Yadav Nagpur crime news}

‘तीन लाख घे आणि भूखंडाचा आग्रह सोड नाही तर घरी गुंड पाठवून इभ्रत लुटल्या जाईल’, अशी धमकी दिली. त्यानंतरही महिलेने भूखंड देण्यास नकार दिला असता मुन्ना यादव, पंजू तोतवानीसह अन्य आरोपींनी महिलेशी अश्‍लील चाळे करीत विनयभंग केला.

nagpur
भाजपच्या मुन्ना यादवसह पंजू तोतवानीवर गुन्हा; महिलेशी केले अश्‍लील चाळे
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : भूखंड खरेदीच्या व्यवहारातून धमकी देऊन महिलेशी अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेता व संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचा माजी अध्यक्ष मुन्ना यादव, कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू किसनचंद तोतवानी (४५, रा, प्लॉट क्र.१४१, खामला, प्रतापनगर) व साथीदारांविरूद्ध विनयभंग, धमकी देण्यासह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल २० दिवसांनंतर ॲट्रॉसिटीचा हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांने नागपुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राजवीर यादव, गणेश यादव, प्रॉपर्टी डिलर प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जयताळा भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी - काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद डोंगरे हे प्रॉपर्टी डिलर आहेत. झारखंड येथील सिनू नावाच्या व्यक्तीने त्यांना प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे अधिकार दिले असून, सिनू याचा पांडुरंगनगर येथे भूखंड आहे. महिलेने प्रमोद यांच्यासोबत पांडुरंगनगर येथील भूखंड १२ लाखांमध्ये खरेदीचा व्यवहार केला. महिलेने प्रमोद यांना सहा लाख रुपये दिले. महिलेने घराच्या रजिस्ट्रीबाबत प्रमोद यांच्याकडे आग्रह केला. प्रमोद यांनी रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली.

याच दरम्यान प्रमोद यांनी याच भूखंडाचा व्यवहार मुन्नाचा पंटर असलेल्या राजवीर यादव यांच्यासोबत केला. त्यामुळे प्रमोद हे महिलेला रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करू लागले. हे प्रकरण भाजप नेता आरोपी मुन्ना यादव याच्याकडे गेले. मुन्ना यादव याने पंजू तोतवानीला त्या महिलेचा बंदोबस्त करण्यास सांगितले. पंजू त्या महिलेला अजनी येथील मुन्नाच्या कार्यालयात घेऊन गेला.

‘तीन लाख घे आणि भूखंडाचा आग्रह सोड नाही तर घरी गुंड पाठवून इभ्रत लुटल्या जाईल’, अशी धमकी दिली. त्यानंतरही महिलेने भूखंड देण्यास नकार दिला असता मुन्ना यादव, पंजू तोतवानीसह अन्य आरोपींनी महिलेशी अश्‍लील चाळे करीत विनयभंग केला. महिलेने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुन्ना यादव, पंजू तोतवानी याच्यासह चौघांविरूद्ध गुन्हे दाखल केला.

अधिक वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

२० दिवसांनंतर गुन्हा दाखल

महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पीआय यांनी आरोपींशी अर्थपूर्ण व्यवहार करीत योग्य गुन्हे दाखल केले नव्हते. त्यामुळे ती महिला सीपी अमितेश कुमार यांना भेटली. त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी मुन्ना यादव, पंजू तोतवानी यांच्यासह चौघांविरुद्ध विनयभंग, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तपासादरम्यान महिलेला जातीवाचक शिविगाळ करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी २० दिवसानंतर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.