esakal | तोतया पोलिसांच्या टोळीवर मोक्का, गुन्हे शाखेची कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Branch police arrested a gang of seven

पोलिस असल्याचे सांगून सामान्य नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी नवीन कामठीतील बेरोजगार असलेल्या युसूफ अली अमिर अली (३७) याने टोळी तयार केली. सुरुवातीला चुलत भाऊ हैदर अली युसूफ अली (३०, नवीन कामठी) याला हाताशी धरून कामठीतील वेगवेगळ्या रस्त्यावर उभे राहून पोलिस असल्याचे सांगून लुबाडण्यास सुरूवात केली. 

तोतया पोलिसांच्या टोळीवर मोक्का, गुन्हे शाखेची कारवाई 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर  ः पोलिस असल्याचे सांगून राज्यभरातील वृद्ध आणि महिलांना लुबाडणाऱ्या नागपुरातील सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या टोळीवर मोक्का लावण्यात आला. त्यांच्याकडून जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून ही टोळी कार्यरत होती. या टोळीवर राज्यातील अन्य जिल्ह्यात २६ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस असल्याचे सांगून सामान्य नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी नवीन कामठीतील बेरोजगार असलेल्या युसूफ अली अमिर अली (३७) याने टोळी तयार केली. सुरुवातीला चुलत भाऊ हैदर अली युसूफ अली (३०, नवीन कामठी) याला हाताशी धरून कामठीतील वेगवेगळ्या रस्त्यावर उभे राहून पोलिस असल्याचे सांगून लुबाडण्यास सुरूवात केली. 

जाणून घ्या - "जीवनाला कंटाळलो आहे" असं म्हणत युवक थेट चढला रेल्वेच्या डब्यावर अन् घडला अंगावर काटे आणणारा थरार
 

ही शक्कल कामी आली आणि दिवसभरात दोघेही ५ ते १० हजार रुपये कमाई करू लागले. त्यामुळे त्यांना टोळी तयार करण्याची कल्पना सूचली. मोसिन रजा गुलाम रजा (३२, नवीन कामठी), जासीम अली मेहंदी अली (५२, येरखेडा, तारामाता चौक, कामठी), मोहम्मद ओवेस मोहम्मद शाहिद (१९) , शब्बीर अली सलीम अली (३३) आणि नादीर जैदी तालीब जैदी (४२,हैदर चौक, नवीन कामठी) यांना टोळीत सहभागी करून घेतले. शहरातील पोलिसांचा बंदोबस्त पाहता त्यांना शहराबाहेर तोतयागिरी करण्याचे ठरविले.
 

ग्रामीण विभागात दबदबा

नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यापाड्याकडे जाणाऱ्या रोडवर ही सात जणांची टोळी उभी राहत होती. पोलिस असल्याचे सांगून वाहनाची कागदपत्रे तपासणे आणि चालानच्या नावावर जबरदस्त वसुली करायला लागले. वारंवार तेच काम करीत असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले. त्यामुळे त्यांनी वसुलीचा वेगही वाढवला.
 

नवी दिल्लीतही घातला गंडा

युसूफ अलीची टोळी पटाईत झाल्याने राज्यातील औरंगाबाद, धुळे, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर या शहरात ही टोळी पोलिस असल्याचे सांगून लुटमार करायला लागली. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट नवी दिल्ली गाठली आणि दिल्लीकरांना गंडविणे सुरू केले. पोलिसांसारखे अगदी हुबेहूब वर्तन करणाऱ्या या टोळीवर आतापर्यंत २६ गुन्हे दाखल आहेत. 
 

असा सापडला धागा

शांतीनगरात बेबीबाई लक्षणे या वृद्धेची सोनसाखळी दहीबाजार उड्डाणपुलावर दोघांनी पोलिस असल्याचे सांगून लुटमार केली होती. या गुन्ह्याचा छडा लावताना ही टोळी गवसली. सध्या ही टोळी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अति. आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली. 

संपादन : अतुल मांगे