नागपुरात पंधरा वर्षांच्या मुलीवर चौघांनी केला अत्याचार

crime
crime

नागपूर :  जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर प्रियकरासह चौघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकण्यात येत होता. युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. जरीपटका पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करून अटक केली. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावे अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी रिया (बदललेले नाव) जरीपटक्यात राहते. ती दहाव्या वर्गात आहे. तिच्या घराजवळच आरोपी यश मेश्राम राहतो. तो टॅंकरचालक आहे. त्याच्यासोबत तिची मैत्री होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांच्या नेहमी भेटी-गाठी होत होत्या. ते दोघेही नेहमी फिरायला जात होते. त्यामुळे यशवर तिचा विश्‍वास होता.

२५ ऑगस्टच्या सायंकाळी सातच्या सुमारास यशने रियाला बाईकने फिरून येऊ असे म्हणून दुचाकीवर बसवले. त्यांनी तिला त्यामुळे नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉनजवळ नेले. तिथे अंधारात आणि झाडाझुडूपात यशने रियाशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी तिथे आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले पोचले. त्यांनी यशला मारहाण केली आणि तिचे कपडे आपल्या ताब्यात घेतले. तिला घरी नग्न अवस्थेत पाठविण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली रिया त्या तिघांच्या गयावया करायला लागली. कपडे परत देण्यासाठी त्यांनी तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. तिने नकार देताच जीवे मारू आणि तुझ्या आईवडीलांना सांगू, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर यशने तिला दुचाकीने परत आणून अमितच्या घराजवळच्या फार्मसीजवळ सोडले आणि आणि हा प्रकार कोणाला सांगू नको, अशी विनंती केली. जीवाच्या धाकाने आणि आपल्या बदनामीच्या भीतीपोटी रिया गप्प बसली.

सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ती मुलगी दूध आणायला गेली असता आरोपी अभिनेशने तिला गाठले. ‘आज आम्ही पुन्हा तिघेही तयार आहोत, मागच्या सारखेच आज करायचे आहे, त्यामुळे सायंकाळी तुला घ्यायला येणार आहे, असे म्हणून तयार राहण्यास सांगितले. नकार दिल्यास बदनामी करू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली रिया घरी आली आणि रडत बसली. तिच्या आईने तिला कारण विचारले असता तिने झालेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने आपल्या नातेवाईकांना घरी बोलवून घेतले. त्यानंतर रात्री जरीपटका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा - चेतनने केला होता ‘जेल ब्रेक’चा प्लॅन, पोलिसांवर करणार होते गोळीबार

प्रियकरानेच रचला कट
यश आणि रियाचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे तो तिला नेहमी घटनास्थळावर नेत होता. अन्य तिन आरोपीसुद्धा टॅंकरचालक असून यशचे मित्र आहेत. यशनेच अन्य तिघांना सामूहिक पार्टी करण्याची योजना सांगितली. शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना यशनेच आरोपींना फोन करून बोलावले होते. तसेच सोमवारी आणखी एका मित्राला सोबत नेण्याचा प्लॅनही यशने केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com