जागतिक दिव्यांग दिन : नऊ महिन्यांपासून दिव्यांग शिक्षणापासून वंचित; मोजक्यांनाच ऑनलाईन शिक्षण

Crippled deprived of education for nine months
Crippled deprived of education for nine months

नागपूर : कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. यामध्ये दिव्‍यांग विद्यार्थ्यांच्या शाळांचाही समावेश होता. मात्र, ऑनलाइन शिक्षणात सामावून घेण्यासाठी पुरेशा सोयी नसल्याने नऊ महिन्यांपासून दिव्‍यांग विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जगातील दहा टक्के लोकसंख्या म्हणजे ६५ कोटी विविध अंगाने अपंग आहेत. त्याच्या उत्थानासाठी विविध अभियान आणि उपक्रम राबविण्यात येतात. राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी विशेष शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्णबधिर, मूकबधिर, अंध, शारीरिक व्यंग्यत्व, बौधिक अक्षमता, वाचादोष यांसारख्या २१ प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो.

यामधील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातून येत असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडे सोयीसुविधांचा अभाव असतो. मात्र, कोरोनामुळे या शाळांना टाळे लागले. त्यामुळे काही शाळांनी या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय करून दिली. मात्र, सोयीसुविधा उपलब्ध नसलेले विद्यार्थी मागे पडले आहेत. विभागात २१ दिव्यांग प्रकारातील दोन हजारांवर विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शाळांकडून प्रयत्न केले जातात. मात्र, त्यानंतरही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.

ऑनलाईन वर्गात विद्यार्थी कमीच

शहरात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी काही शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाईन शिकविण्यास सुरुवात केली. मात्र, या शिक्षणात ज्या विद्यार्थ्यांकडे सोयीसुविधा आहेत, त्याच विद्यार्थ्यांचा समावेश करणे शक्य झाले. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे विद्यार्थी अद्याप शिक्षणापासून वंचित आहेत. यामध्येही मानसिक विकलांग असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवावे लागते. मात्र, कोरोना काळात शाळा बंद असल्याने ते शक्य नसल्याचे दिसून येते.

पदवी शिक्षणापासून वंचित

उच्च शिक्षणात सातत्याने दिव्यांगांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षणाचे स्वतंत्र दालनच सुरू करण्यात आले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचे पदवी शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच अडचणी येताना दिसते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com