esakal | नागपूर पोलिसांच्या मदतीला आता सीआरपीएफच्या महिला कमांडो
sakal

बोलून बातमी शोधा

crpf lady commando to help nagpur police

पोलिस रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जवानांची थर्मल स्कॅनिंग , प्राणवायू तपासणीसह संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. महिला जवानांना मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, रोग प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या गोळ्याही देण्यात आल्या. 

नागपूर पोलिसांच्या मदतीला आता सीआरपीएफच्या महिला कमांडो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  ः कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिस कर्मचारी सतत बंदोबस्तात आहेत. आता पोलिसांच्या मदतीला चक्‍क केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महिला कमांडो नागपुरात दाखल झाल्या आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी 85 महिला कमांडो तैनात करण्यात आल्या आहेत. 

पोलिस उपायुक्तांचे परिमंडळ दोन, तीन आणि चारमध्ये या जवांनाना तैनात करण्यात आले आहे. यात शहरातील सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतीनगर, जवाहरनगर, पार्वतीनगर, शताब्दी चौक , संतोषनगर, राजीवनगर, टिमकी, पांढराबोडी, गड्डीगोदाम, गौतमनगर, बजेरिया आदी कंटेन्मेन्ट झोनमध्ये तैनात करण्यात आले आहे.

दारू पिण्यास मनाई केल्याने पती चवताळला... रागाच्या भरात रस्त्यावर ओढून केली मारहाण, मग

आवश्‍यकतेनुसार महिला जवानांची अन्य भागात तैनाती करण्यात येईल, अशी माहिती विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली. केंद्रीय राखीव पोलिस दलाची महिला कंपनी शुक्रवारी नागपुरात दाखल होताच नागपुरात दाखल होताच सर्व जवानांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.

पोलिस रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जवानांची थर्मल स्कॅनिंग , प्राणवायू तपासणीसह संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. महिला जवानांना मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, रोग प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या गोळ्याही देण्यात आल्या. 

तैनात करण्यात आलेल्या जवानांची संख्या 

परिमंडळ दोन- सदर, अंबाझरी पोलिस स्टेशन दोन सेक्‍शन ( प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आठ जवान) 
परिमंडळ तीन- लकडगंज व तहसील पोलिस स्टेशनमध्ये एक प्लॉटून (दोन अधिकारी,15 जवान एकूण ) 
परिमंडळ चार- अजनी पोलिस स्टेशनमध्ये एक प्लॉटून (17 एकूण जवान) 
परिमंडळ पाच- यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये एक सेक्‍शन ( एकूण आठ जवान)