जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात दारूबंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

या निवडणुकीच्या क्षेत्रातच ही मद्यबंदी असेल. याखेरीज 9 जानेवारी रोजी कळमेश्वर- ब्राह्मणी नगरपरिषद आणि कन्हान -पिपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी तसेच खापरी रेल्वे आणि हरदोली पुनर्वसन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 9 जानेवारीला मतदान आणि 10 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या एक दिवसपूर्वीसाठी या निवडणूक क्षेत्रांमध्ये मद्यबंदी घोषित करण्यात आली आहे.

नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सोमवार, मंगळवार या दोन दिवसांसाठी मद्यबंदी घोषित केली आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजे बुधवारी 8 जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम असेल. या निवडणुकीच्या क्षेत्रातच ही मद्यबंदी असेल. याखेरीज 9 जानेवारी रोजी कळमेश्वर- ब्राह्मणी नगरपरिषद आणि कन्हान -पिपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी तसेच खापरी रेल्वे आणि हरदोली पुनर्वसन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 9 जानेवारीला मतदान आणि 10 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या एक दिवसपूर्वीसाठी या निवडणूक क्षेत्रांमध्ये मद्यबंदी घोषित करण्यात आली आहे. 8 ते 10 जानेवारी दरम्यान सदर क्षेत्रात मद्यबंदी घोषित करण्यात आली आहे. 10 जानेवारीला मतमोजणीनंतर मद्यबंदी हटविण्यात येईल.

हे वाचाच - निघाल्या तलवारी आणि झाले सपासप वार

24 हजारांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पारडी, सदर व या पोलिस स्टेशन हद्दीत अवैद्य दारू विक्री करणाऱ्या सहा जणांवर कारवाई करून 24,286 रुपये किमतीचा माल जप्त केला. या कारवाईत गीता बेवेकर, दुर्गा फुलकर, अनिल देशमुख, शुभम राजेश शिपाई, महेश चौधरी, विजय स्वामी, हरीश निमजे, शुभम राजू टेकाम, शोभा धार्मिक यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच 31 लिटर देशी व 211 लिटर मोहा दारू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक रावसाहेब कोरे व दुय्यम निरीक्षक राहुल अंभोरे यांनी केली. सहाय्यक दुय्यम निरीक्षक कवडू रामटेके, जवान महादेव कांगणे, रेश्‍मा मते व चालक राजू काष्टे व रवी निकाळजे यांनी भाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darbundi in Nagpur district for Zilla Parishad elections