"त्यांनी' नोकरी सोडावी यासाठी बदली करण्याचे षडयंत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

साडेसहा हजार ते सात हजार रुपये वेतन घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची बदली मुंबईत झाली तर तो कर्मचारी नोकरी सोडतील, हाच यामागचा उद्देश असल्याचे दिसून आले.

नागपूर : आयुष्यातील दहा ते पंधरा वर्षे सेवा देणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढण्याची नोटीस देण्यात आली आहे. अवघ्या साडेसहा हजारात महिनाभराची मेहनत विकणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता, आता त्यांच्या बदलीचे संकेत या एचएमआयएसतर्फे देण्यात आले आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

मेडिकलमध्ये पंधरा वर्षांपासून हे डाटा एन्ट्री ऑपरेटर्स इमानेइतबारे सेवा देत आहोत. नोकरीवरून काढले आमच्या मुलाबाळांना जगवायचे कसे? ही व्यथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यामार्फत न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. मात्र, या कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना पुणे, मुंबई व इतर ठिकाणी बदली करण्यात येईल असे सांगण्यात आले. साडेसहा हजार ते सात हजार रुपये वेतन घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची बदली मुंबईत झाली तर तो कर्मचारी नोकरी सोडतील, हाच यामागचा उद्देश असल्याचे दिसून आले.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

मेडिकलमध्ये 2009 मध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत राज्यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये "ऑनलाइन' करण्याचा प्रकल्प सुरू झाला. आता 18 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. पहिला प्रकल्प नागपूरच्या मेडिकलमध्ये सुरू झाला होता. 

पुढे केले खोटे कारण 
टप्प्या-टप्प्याने मेडिकल, मेयो, मुंबई, पुणेसह राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइन एचएमआयएस लागू करण्यात आली. "एमआयडी' नंबरद्वारे रुग्णाच्या आजारासह उपचाराचा सर्व आराखडा मुंबई-पुणे येथे बघता येतो. या कंपनीत दहा-पंधरा वर्षे सेवा देणारे कर्मचारी कंत्राटीवरील डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी कायम करण्याची मागणी करू नये या भीतीपोटी एचआयएमएसचा कंत्राट संपला असे खोटे कारण पुढे करीत आहेत. हे कारण देत नोकरीवरून काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: data entry operator forced to resign