
नागपूर : हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत राज्यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय "ऑनलाइन' करण्याचा प्रकल्प 2009 मध्ये सुरू झाला. पहिला प्रकल्प नागपूरच्या मेडिकलमध्ये सुरू झाला. या प्रकल्पाअंतर्गत मेडिकलमध्ये कंत्राटी पद्धतीवर पंचवीसपेक्षा अधिक डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली. दहा ते अकरा वर्षे इमानेइतबारे सेवा देणाऱ्या या कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना कोरोनाच्या लॉकडाउनचा फायदा घेत नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह अनेक विभागांमध्ये रुग्णांची माहिती एका "क्लिक'वर उपलब्ध व्हावी या हेतूने ही "ऑनलाइन' पद्धत सुरू झाली. मेडिकलमध्ये कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी अतिशय योग्यरीतीने काम हाताळले. दहा ते बारा वर्षे मेडिकलमध्ये काम सांभाळणाऱ्या 24 कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना अचानक नोकरीवरून काढण्यात येणार असल्याची नोटीस ऐन कोरोना आणीबाणीच्या काळात देण्यात आली. 10 वर्षे मेडिकलमध्ये रुग्णहितासाठी मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. दहा वर्षे "ऑनलाइन' सेवा वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाह्यरुग्ण विभागात यशस्वी झाली. प्रारंभी पहिल्या टप्प्यात मेडिकल, मेयो आणि मुंबईचे जेजे तर दुसऱ्या टप्प्यात पुण्याचे बीजे मेडिकल कॉलेज, यानंतर मुंबई आणि राज्यातील सर्वच 14 वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइनद्वारे 2013 पर्यंत जोडण्याचे वचन देण्यात आले होते. नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती असलेला रुग्ण मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर "एमआयडी' नंबरद्वारे रुग्णाच्या आजारासह उपचाराचा सर्व आराखडा मुंबईत बसून बघता येईल, अशी सोय हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत होती. परंतु, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे दहा वर्षांत ऑनलाइन जोडणी झाली नाही. या योजनेअंतर्गत "मेडिकल'मध्ये बाह्यरुग्ण विभागापासून तर एक्स रे विभाग तसेच इतरही ठिकाणी ही ऑनलाइन पद्धत सोयीची आहे.
सविस्तर वाचा - सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या
...तर आत्महत्या करणार
कर्मचाऱ्यांनी दहा वर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना कायम करण्याची मागणी करू नये, या भीतीपोटी एचआयएमएसचा कंत्राट संपला, असे खोटे कारण पुढे करीत नोकरीवरून काढण्याचा सपाटा सुरू केला. या 24 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्यानंतर उपासमारीला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले असून याची जबाबदारी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत प्रशासनावर असेल, असा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.