पप्पा गेल्यामुळे मला जीवनात रस राहिला नाही, मी पण जाते...

Sicide
Sicide

नागपूर : "मला पप्पांची खूप आठवण येते. पप्पा नसल्यामुळे माझ्या जीवनात रस राहिला नाही. मला पप्पा सतत बोलावतात. मी जाते त्यांच्याकडे...' असे म्हणून एका उच्चशिक्षित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्‍कादायक घटना नागपुरातील धंतोलीत उघडकीस आली. शिवाणी प्रशांत टेकाडे (वय 19, रा. चितळे मार्ग, निर्मल अपार्टमेंट, धंतोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाणीचे वडील प्रशांत टेकाडे यांचा नॅपकिन बनविण्याचा कारखाना होता. ते एका नातेवाइकासह मिळून व्यवसाय करीत होते. ते पत्नी आणि एकुलती एक मुलगी शिवाणी हिच्यासोबत धंतोलीत राहत होते. 24 जानेवारीला प्रशांत बळवंत टेकाडे हे जेवण करायला कोंढाळी मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेले होते. परत येत असताना प्रशांत कार चालवत होते.

अंबाझरी गार्डनजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार झाडावर आदळली. अपघात प्रशांत टेकाडे यांचा मृत्यू झाला. तर नातेवाईक अविनाश गाडगे, त्यांची पत्नी तृप्ती आणि मुलगी अपूर्वा व अरुंधती वडतकर हे जखमी झाले होते. प्रशांत यांचे अपघाती निधनामुळे शिवाणीला मोठा धक्‍का बसला होता. तिच्यावर मोठा आघात झाला होता. तेव्हापासून ती नैराश्‍यात होती. 

आई गेली बॅंकेत

शिवाणी ही पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. लॉकडाउनमुळे ती पुण्यातून नागपुरात आली होती. तिची आई इंदिरा या शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बॅंकेत गेल्या होत्या. त्यावेळी शिवाणी घरात एकटी होती. तिने घरात हॉलमध्ये सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. इंदिरा या दोन वाजताच्या घरी गेल्या असता शिवाणीचा मृतदेह पाहताच त्यांना मोठा धक्‍का बसला.

माझ्या मृत्यूस कुणीही जबाबदार नाही

शिवाणी ही मनमोकळ्या स्वभावाची होती. मात्र, वडिलाच्या अपघाती निधनानंतर तिचा स्वभाव बदलला होता. ती एकलकोंडी झाली होती. वडिलांची आठवण काढून आईकडे आपले दुःख व्यक्‍त करीत होती. "मला वडिलांची खूप आठवण येत गं आई' असे म्हणत रडत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाइड नोट लिहून "माझ्या मृत्यूस कुणीही जबाबदार नाही' असे वाक्‍य लिहिले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com