का दिला सीबीएसई शाळांना कारवाईचा इशारा, जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

लॉकडाउनमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असताना काही शाळांमार्फत परीक्षा शुल्क मासिक शुल्क, स्कूलबस शुल्काची मागणी केली जात आहे.

नागपूर : सीबीएसई शाळेच्या शैक्षणिक शुल्कावर नियंत्रण आणले जाईल तसेच पाठ्यपुस्तके, गणवेश शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिला. जय जवान जय किसान आणि जागृत पालक समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने या संदर्भातील निवेदन सादर केले होते. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

लॉकडाउनमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असताना काही शाळांमार्फत परीक्षा शुल्क मासिक शुल्क, स्कूलबस शुल्काची मागणी केली जात आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सक्ती करण्यात येऊ नये असे आदेश दिले असतानाही शाळा संचालक पालकांवर दबाव टाकत आहे. शुल्क भरल्याशिवाय पुढील सत्रात प्रवेश दिल्या जाणार नाही अशाही धमक्‍या दिल्या जात आहे. पालकांच्या तक्रारी आल्यानंतर जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे, सचिव अरुण वनकर, जागृत पालक समितीचे नितीन नायडू, स्मिता ताजने, संजय शर्मा आदींच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. सीबीएसई शाळांमार्फत सुरू असलेले प्रकार त्यांच्या कानावर घातले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   
                       

नाना पटोले यांचेही आदेश 
शिक्षण उपसंचालक यांच्यानंतर शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. पटोले यांनी तत्काळ शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे यांना तत्काळ बोलावले व सर्व मुद्यांवर चर्चा केली आणि पालकांना लुबाडल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पटोले यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict Action on CBSE schools will be taken