जया प्रदा यांना अजूनही आठवतात ते दिवस.....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

केंद्र सरकारने लागू केलेल्या ट्रीपल तलाक कायद्याने मुस्लीम महिलांची खऱ्या अर्थाने सुटका झालेली असून, या कायद्याने त्यांना संरक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्‍ते शेहजाद पुनावाला यांनी व्यक्त केले. विद्यार्थी संसदेत "ट्रीपल तलाक' विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. पुनावाला म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम मतांवर डोळा ठेवून राजकीय लाभासाठीच या समाजाचा वापर करण्यात आला.

नागपूर : वयाच्या तेराव्या वर्षी अभिनेत्री झालेल्या माजी खासदार जया प्रदा यांनी नृत्य, अभियानाने अनेक वर्षे तरुणांच्या मनावर साम्राज्य गाजविले. मात्र, अभियानामुळे महाविद्यालयीन जीवन जगता आले नसल्याची खंत त्यांनी आज तरुणाईसमोर बोलून दाखवली.

हे वाचाच - त्याने थकविली लाखोंची उधारी आणि सापडला संकटात

रायसोनी शिक्षण समूहाद्वारे आयोजित राष्ट्रीय युवा संसदच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी, ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी उपस्थित होते. जया प्रदा म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवन बरेच आनंददायी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये येऊन विद्यार्थ्यांसारखे वाटत आहे. विचाराचे मंथन हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची व्याख्या आहे. विद्यार्थ्यांनी समाजाचा उत्थान आणि विकास होईल याच हेतूने काम करावे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये बरीच योग्यता असल्याने त्यांच्या माध्यमातून निश्‍चितच देशाचा विकास होऊन प्रगतिपथावर जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात सुनील रायसोनी यांनी राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. मनीष अवस्थी यांनीही विचार व्यक्‍त केले.

"ट्रीपल तलाक' कायद्याने मुस्लीम महिलांना संरक्षण : शेहजाद पुनावाला

केंद्र सरकारने लागू केलेल्या ट्रीपल तलाक कायद्याने मुस्लीम महिलांची खऱ्या अर्थाने सुटका झालेली असून, या कायद्याने त्यांना संरक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्‍ते शेहजाद पुनावाला यांनी व्यक्त केले. विद्यार्थी संसदेत "ट्रीपल तलाक' विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. पुनावाला म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम मतांवर डोळा ठेवून राजकीय लाभासाठीच या समाजाचा वापर करण्यात आला. कुणीही त्यांच्या उन्नतीसाठी पावले उचललेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला सरकारने पास केले. जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणतात, त्यांनी मुस्लीम महिलांच्या समस्यांचे निवारण केले नसल्याचे ते म्हणाले. मोहम्मद अझीमुद्दीन यांनी कायद्यात तीन वर्षाची शिक्षा ही शोषितांच्या परिवारांना सामाजिक आणि आर्थिकरित्या दुर्बल करणारी असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The days that Jaya Prada still remembers .....